मराठी पुस्तकांचा इंटरनेटवरील व्यवहार आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक प्रकाशकांनी त्यांच्या वेबसाईटस बनवून त्याद्वारे पुस्तकविक्री सुरु केली आहे. काही पुस्तकविक्रेतेही आता ऑनलाईन विक्रीकडे वळलेले आहेत आणि फक्त इंटरनेटवरच ऑनलाईन पुस्तकविक्री करणारे नव्या युगातले व्हर्चुअल पुस्तकविक्रेतेही उदयाला आले आहेत. 

या सगळ्या भाउगर्दीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट…. खरंतर ऊणीव…. जाणवते. एखाद्या प्रकाशकाच्या वेबसाईटवरुन त्याच्याच पुस्तकांची माहिती मिळते. एखाद्या पुस्तकविक्रेत्याच्या वेबसाईटवरुन त्याच्याकडे असलेल्याच पुस्तकांची माहिती मिळते. मात्र मराठीतल्या लाखो पुस्तकांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याची सोय असलेल्या सर्वसमावेशक वेबसाईटची उणीव marathibooks.com ने भरुन काढण्याचे ठरवलेय.

काही वर्षापूर्वी पुस्तकाच्या इंटरनेटवरील विक्रीला प्रकाशकांकडून प्रतिसाद मिळत नसे. इ-बुक्स बनवणे तर दूरच. मात्र आता अनेक प्रकाशकांनी स्वत:च्या गाजलेल्या पुस्तकांची इ-बुक्स बनवायचा सपाटा लावलाय. त्यातच काही संस्थांनी केवळ इ-बुक्स द्वारेच पुस्तक प्रकाशन करण्याचे संकल्प सोडले आहेत. काही लेखकही आता प्रतिथयश प्रकाशकांकडे जाण्याऐवजी स्वत:च स्वत:ची पुस्तके इ-बुक्सच्या स्वरुपात प्रकाशित करु लागले आहेत.

या सर्वांसाठी एक व्यासपीठ या स्वरुपात marathibooks.com उपलब्ध आहे.

आत्ताच्या घडीला या वेबसाईटवर ५०,००० हून जास्त पुस्तकांची माहिती संकलित झाली आहे. यात दिवसेंदिवस नव्याने भर पडत आहे. मराठीत प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांची माहिती या वेबसाईटवर असावी हे आमचे स्वप्न आहे. भले मग ती पुस्तके आमच्याकडे विक्रीसाठी असोत अथवा नसोत.

ही वेबसाईट केवळ पुस्तकविक्रीचे दुकान नसून पुस्तकप्रचाराचे एक व्यासपीठ या स्वरुपात आकारतेय. सर्व प्रकाशक आणि लेखकांना आवाहन आहे की त्यांनी आपल्या जास्तीत जास्त पुस्तकांची माहिती या वेबसाईटवर पाठवावी.

मराठीबुक्स डॉट कॉम ची वैशिष्ट्ये

मराठीतील ५०,००० हून अधिक पुस्तकांची माहिती.
पुस्तकांचा परिचय आणि परिक्षणे
पुस्तकांमध्ये सतत पडणारी भर
१,००,००० पेक्षा जास्त नेटवर्क वाचक
पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक, विषय, वर्गवारी, किवर्ड यावरुन पुस्तकाचा शोध घेण्याची सोय.
पुस्तकावर अभिप्राय लिहिण्याची वाचकांना सोय.
प्रकाशकांसाठी पुस्तक विक्रीची सोय
प्रकाशकांसाठी पुस्तकाची जाहिरात करण्याची सोय
नामवंत वेबसाईटसवरुन पुस्तक प्रचार