मराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो जास्त पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल. कदाचित मराठीतील सर्व पुस्तकांची संख्या काही लाखातही असण्याची शक्यता आहे.
दुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.
सध्या अस्तित्त्वात असलेल्या पुस्तकविषयक वेबसाईटसमध्ये त्या त्या साईटसवर विक्रीसाठी असलेल्या पुस्तकांचीच माहिती दिलेली दिसते. जी पुस्तके विक्रीसाठी नाहीत त्यांची माहिती उगाच का ठेवावी असा विचार कदाचित या वेबसाईटस करत असतील.
पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायविषयक माहिती देण्यासाठी महाराष्ट्रातून काही मासिके प्रकाशित होत असत. मेहतांचे “मेहता ग्रंथजगत”, मॅजेस्टिकचे “ललित” यासारखी मासिके नवीन आलेल्या पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतात. मात्र यात मुख्यत त्यांच्या स्वत:च्या प्रकाशनांची माहिती जास्त असते.
बाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. त्यात पुन्हा जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त प्रती छापायला लागणार आणि ते खर्चिक काम होणार. यावर एकच मार्ग... तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम !
यासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने “www.marathibooks.com” या मेगा-पोर्टलची निर्मिती झाली आहे. पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही असे या मेगा-पोर्टलचे स्वरुप आहे.