Sale!

भारताची सागरी सुरक्षा – भाग २

150.00 70.00

ख्यातनाम संरक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि विश्लेषक ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांच्या तीन भागांच्या या इ-पुस्तकाच्या दुसऱ्या भागामध्ये किनारी राज्यांतील सागरी सुरक्षेतील उणीवा, उपाय योजना, सागरी सुरक्षा, भारतीय नौदल आणि इतर संस्था, बंदरे, सागरी आणि समुद्री आस्थापनांचे संरक्षण, द्विपप्रदेशांची सागरी सुरक्षा, देशाच्या जमिनी सिमांचे रक्षण / व्यवस्थापन या अनेक पैलूंवर चर्चा करण्यात आली आहे.

भारताला गेल्या दशकापासून अपारंपारिक धोके वाढत आहेत. यात सागरी दहशतवाद, चाचेगिरी, नैसर्गिक आपत्ती व प्रादेशिक संकटे यांचा समावेश होत असतो. त्यांचे प्रमाणही वाढते आहे. सागरी सुरक्षेत गुंतलेल्या प्रत्येक दलास असे वाटत असते की, हे काम ही त्यांच्यावर लादण्यात आलेली अतिरिक्त जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, नौदलातील अनेकांना असे वाटते की, नौदलाचे प्रमुख कर्तव्य युद्धप्रसंगात देशाचे संरक्षण करण्याचे आहे. ’निळ्या पाण्यातील’ सामर्थ्य वाढवण्याचे आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे नाही.

तीन भागांच्या या इ-पुस्तकाच्या निमित्ताने सागरी सुरक्षेची गुणवत्ता सुधारणे आणि बळकट करण्याकरता सर्व हितसंबंधियांत विविध माध्यमांतून माहितीपूर्ण चर्चा सुरू व्हावी अशी आशा आहे.

या इ-पुस्तकाच्या प्रत्येक भागाची किंमत रु.१५०/- असून सवलत किंमत रु.७०/- आहे.

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
लेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन / Brig Hemant Mahajan

किंमत : रु. १५०/-
सवलत किंमत : रु. ७०/-

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: bharatachi-sagari-suraksha-part-2 Categories: , , Tag:

Description

ख्यातनाम संरक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि विश्लेषक ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांच्या तीन भागांच्या या इ-पुस्तकाच्या दुसऱ्या भागामध्ये किनारी राज्यांतील सागरी सुरक्षेतील उणीवा, उपाय योजना, सागरी सुरक्षा, भारतीय नौदल आणि इतर संस्था, बंदरे, सागरी आणि समुद्री आस्थापनांचे संरक्षण, द्विपप्रदेशांची सागरी सुरक्षा, देशाच्या जमिनी सिमांचे रक्षण / व्यवस्थापन या अनेक पैलूंवर चर्चा करण्यात आली आहे.

भारताला गेल्या दशकापासून अपारंपारिक धोके वाढत आहेत. यात सागरी दहशतवाद, चाचेगिरी, नैसर्गिक आपत्ती व प्रादेशिक संकटे यांचा समावेश होत असतो. त्यांचे प्रमाणही वाढते आहे. सागरी सुरक्षेत गुंतलेल्या प्रत्येक दलास असे वाटत असते की, हे काम ही त्यांच्यावर लादण्यात आलेली अतिरिक्त जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, नौदलातील अनेकांना असे वाटते की, नौदलाचे प्रमुख कर्तव्य युद्धप्रसंगात देशाचे संरक्षण करण्याचे आहे. ’निळ्या पाण्यातील’ सामर्थ्य वाढवण्याचे आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे नाही.

तटरक्षकदलाच्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी असे वाटत असे की, त्यांच्या प्रमुख कर्तव्यांत केवळ ’शोध आणि सुटका’, नौकानयनास मदत करणे आणि समुद्रावरील प्रदूषण नियंत्रण यांचाच समावेश होतो. सागरी सुरक्षेचा नाही. त्याप्रमाणेच, सागरी पोलिस आणि सीमाशुल्क विभाग असे सांगतात की, त्यांच्याकडे पुरेशी संसाधनेच नाहीत आणि महत्त्वाचे म्हणजे सागरी सुरक्षा कर्तव्ये सांभाळण्यास आवश्यक असलेली मनोवृत्तीही नाही. तस्करीच्या प्रतिबंधाचे काम करणाऱ्या सीमाशुल्क (कस्टम्स मरीन ऑर्गनायझेशन) विभागाने, देशाची अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर, आपली भूमिकाच आवरती घेतली आहे. इंटेलिजन्स ब्युरो व रिसर्च अँड अनालिसिस विंग (रॉ); दहशतवादाची वास्तवाहून खूपच मोठी अशी चित्रे रंगवतात.

काही किनारी राज्ये अशी भूमिका मांडतात की सागरी सुरक्षा केंद्राची जबाबदारी असावी. कारण राज्यांकडे; सागरी सुरक्षेकरता जरूर असलेले अतिरिक्त मनुष्यबळ, नौका, इंधन आणि इतर पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने उपलब्ध नाहीत. सागरी सुरक्षेप्रती ही बेदरकार वृत्ती खालपर्यंत उतरते आणि सागरी सुरक्षा समन्वयनाच्या निरनिराळ्या सभांतील सहभाग, अंमलबजावणी व तळातील समन्वयनास विपरितरीत्या प्रभावीत करते.
वादविवाद थांबले पाहिजेत. किनाऱ्यावरील सर्व दलांना हे समजावून दिले पाहिजे की, सर्व हितसंबंधी सागरी सुरक्षेकरता जबाबदार आहेत.

ख्यातनाम संरक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि विश्लेषक ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे याच विषयाला वाहिलेले अभ्यासपूर्ण इ-पुस्तक, भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल, हे सर्व हितसंबंधियांनी, म्हणजेच सुरक्षाकर्मी, धोरणकर्ते, संबधित उद्योगपती, सुरक्षातज्ज्ञ, तंत्रज्ञानाचे पुरवठादार आणि इतरांनीही वाचायलाच पाहिजे.

या इ-पुस्तकाच्या निमित्ताने सागरी सुरक्षेची गुणवत्ता सुधारणे आणि बळकट करण्याकरता सर्व हितसंबंधियांत विविध माध्यमांतून माहितीपूर्ण चर्चा सुरू व्हावी अशी आशा आहे.

या इ-पुस्तकाच्या प्रत्येक भागाची किंमत रु.१५०/- असून सवलत किंमत रु.७०/- आहे.

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti लेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन / Brig Hemant Mahajan

किंमत : रु. १५०/- सवलत किंमत : रु. ७०/-

हे इ-पुस्तक वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

लेखक संपर्क

ब्रिगेडियर हेमंत महाजन हे निवृत्त सेनाधिकारी असून ते विविध विषयांवर लिहितात.  स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते.

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com