Sale!

‘त्रि’धारा

100.00 80.00

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

माणसाच्या मनात अशा कितीतरी धारा सतत वास्तव्याला असतात. काहीवेळा त्या जाणवत नाहीत. जाणवल्या तरी त्यांचे आकारमान इतके खुजे असते की, त्यांच्यावर परिश्रम करावेसे वाटत नाहीत. काही जणांकडे त्या धारांना जीभ/ ओठ देऊन बोलतं करण्याची शक्ती नसते. ते फक्त त्या धारा स्वतःपुरत्या राखतात, सहनही करतात.

लेखक : नितीन देशपांडे
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ७५/-

प्रिमिअम सभासदांसाठी : रु. ५०/-

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: tridhara-by-nitin-deshpande Category: Tags: ,

Description

“त्रि” धारा – एका लेखकाचे तीन प्रवाह !

हा आहे तीन लघु कादंबऱ्यांचा संग्रह – रूढार्थाने एक सलग कादंबरी नाही. तिन्ही प्रवाह भिन्न, एका पात्रात मिसळलेले पण “संगम” नाही. स्वायत्तपण जपत समांतर धावणारे हे लेखन काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झालंय, फक्त लेखक सामाईक ! दोन लघु कादंबऱ्या पूर्वप्रकाशित पण त्यांच्याबरोबर घरात बासनात असलेली तिसरी घुसडलेली. एका लघु कादंबरीचा फॉर्म डायरीचा, दुसरीचा पत्रापत्रीचा आणि तिसरी सरळधोपट वाहत जाणारी.

“मनाची डायरी” विस्कळीत तुकड्यांना एकत्रित बांधून ठेवण्याची पराकाष्टा करणाऱ्या तरुणाची. एकेक करून सगळेच हातातून निसटून जाणारे आणि हा स्तब्ध- मोकळ्या हातांचा, नोंदी करणारा फक्त !

“क्षितिज बोलावतंय” – पती-पत्नी नाते कसोशीने जपूनही आकाशाला ओ द्यायला निघालेल्या पत्नीने आपल्या पतीचा, कुटुंबाचा हात सोडण्याची गाथा. १९८६ च्या सुमारास करिअर आणि कुटुंब यांच्यातील द्वंद्व तितकेसे प्रखर नव्हते. पण काळाने हे लेखन आता सिद्ध केलेले आहे – DINK ( डबल इन्कम नो किडस) किंवा सिंगल पेरेंटिंग या टप्प्यावर स्थिरावलेला आजचा समाज. तंत्रज्ञानाने मात केलेली कुटुंब व्यवस्था आज पैलतीरावरच्या कोणत्या हाकेला ओ द्यायची या संभ्रमात आहे. पण काळाच्या पुढे जाऊन हे चित्र ” क्षितिज बोलावतंय” मध्ये सुमारे चाळीस वर्षांपूर्वी रेखाटले गेलंय.

“सहप्रवासी” मध्ये अभियांत्रिकीच्या चार वर्षांचा कालपट चित्रित झालाय. अर्थात त्यांत फक्त मित्र-मैत्रिणी नसून शिक्षक, नातेवाईक, मृत्यू, महाविद्यालयातील धमाल असा सर्वांगीण सहप्रवास आहे. त्यांतील पात्रे खरी आणि बहुतांशी आजही हयात आहेत. त्यांच्याच उपस्थितीत “त्रि”धारा चे प्रकाशन झाले होते. सत्य-कल्पनेच्या छायाप्रकाशात सहप्रवासी घुटमळते.

“त्रि”धारा प्रकाशित झाले १९९९ साली आणि आता त्या पुस्तकाचे नव्या रूपात आगमन होतेय. पण काळाच्या नदीत खूप पाणी वाहून गेले असले तरीही आजची जगण्यातील अपरिहार्यता तिन्ही लघुकादंबऱ्यांमध्ये तेव्हाही तशीच प्रतिबिंबित झालीय. तशा अर्थाने या “धारा” समकालीन आहेत आणि राहतील.

लेखक : नितीन देशपांडे
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १००/- सवलत किंमत : रु. ७५/-

प्रिमिअम सभासदांसाठी : रु. ५०/-

Tridhara
Dr Nitin Deshpande
Marathisrushti