वेगळी माती, वेगळा वास
₹260.00
मी आजपर्यंत प्रवासाशी संबंधित असे जे ललित लेखन केले, ते सगळे इथे एकत्र जुळवले आहे. इतर ललित लेखांबरोबर सुटे-सुटे, इथे-तिथे असे माझे प्रवासविषयक लेख आतापर्यंत प्रसिद्ध झाले. ज्या चार ललितलेखसंग्रहांत हे लेख विखुरलेले होते, त्यांपैकी एका पुस्तकाचा अपवाद वगळता, इतर तीन लेखसंग्रह आता उपलब्धही नाहीत; म्हणून प्रवासाच्या एकाच सूत्रात गुंफलेले या पुस्तकातले लेख रसिकांसमोर नव्याने एकत्र सादर केले आहेत. त्यांचा स्पर्श आणि वास रसिकांना वेगळा वाटला, तर या पुस्तकाचे सार्थक आहे.
लेखक : डॉ. अरुणा ढेरे / Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन / Padmagandha Prakashan
पाने : १९२
किंमत : रु. २६०/-
लेखक संपर्क
`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९फोन : (०२०) २४२२९२८०