महाभारत : एक सुडाचा प्रवास

महाभारत एक सुडाची मालिका आहे. व्यक्तिगत सूड घेण्यासाठी सुरू झालेला हा प्रवास भयंकर अशा महायुद्धा मध्ये रुपांतरीत होतो.या युद्धाला केवळ द्रौपदी व दुर्योधन कारणीभूत नसून अनेक अनेक व्यक्तींचा परस्परांशी असलेली दुश्मनी आणि त्यातून निर्माण झालेली सुडाची भावना लेखकाने या पुस्तकात व्यक्त केली आहे.

परशुरामाने आपल्या पित्याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी हैहय  कुळाचा सर्वनाश केला…इथपासून सुरू झालेला हा प्रवास पुढेपुढे अधिक हिंस्र होत जातो.अंबा जिने भिष्माचा सूड घेण्यासाठी शेवटी पेटत्या चितेत उडी घेतली आणि पुढे शिखंडी होऊन पितामह भीष्माचार्य यांचा सूड घेतला.भीमाने दु:शासनाचे रक्त पिऊन सूड उगवला! महाभारतातील अनेक पात्र सुडाने पेटलेले पाहायला मिळतात…त्याची सर्व कहाणी या पुस्तकात!


गुरू द्रोण झालेल्या अपमानाने पेटून उठतात.राजा द्रुपद याचा सूड घेण्यासाठी अर्जुन आणि शिष्यांना उत्तम शस्त्रविद्या शिकवतात आणि त्यांच्या करवी द्रुपद राजाला पराभूत करून घासत घेऊन जातात…त्याचा बदला पुढे द्रौपदीचा भाऊ द्रोणाचार्य यांचा शिर धडावेगळे करून घेतो.त्याचा प्रतिशोध द्रोण पुत्र अश्वत्थामा रात्री झोपी गेलेल्या पांडव पुत्रांची हत्या करून घेतो….असे अनेक महाभारतातील पात्र सूड घेण्यासाठी जगतात आणि मृत्यूला सामोरे जातात.

कृष्ण,विदुर आणि भीष्म पितामह सारखे तत्वचींतक महान ज्ञानी पात्र अंबा,अर्जुन,भीम,दुर्योधन,कर्ण,द्रौपदी, द्रुपद,द्रोण यांच्या मनोभूमिका बदलू शकत नाहीत ही महाभारतातील एक गोष्ट लेखक आपल्या ध्यानात आणून देतात.

दाजी पणशीकर सुरुवातीच्या प्रकरणात भृगूकुळ आणि हैहय कुळातील सूड संघर्ष वर्णन करतात.यात परशुरामाच्या संहाराला दूषणे देतात.21 वेळा पृथ्वी वरील क्षत्रियांचा वंश नष्ट करण्यासाठी केलेला रक्तपात ..त्यासाठी परशुरामाला दोषी धरतात.

पुस्तकाची मांडणी विचार करायला लावणारी आहे.विचारवंत,प्रवचनकार,कीर्तनकार,व्याख्याते यांच्या तर हे पुस्तक उपयोगी आहेच..पण प्रत्येक विचार करणाऱ्या माणसाला विचारांची दिशा देणारे हे पुस्तक आहे.

लेखक: दाजी पणशीकर
प्रस्तावना: नरहर कुरुंदकर
प्रकाशन: मॅजेस्टिक प्रकाशन

पृष्ठ : ४४२
मूल्य:५०० ₹ 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*