मराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल. कदाचित मराठीतील सर्व पुस्तकांची संख्या काही लाखातही असण्याची शक्यता आहे.

दुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या पुस्तकविषयक वेबसाईटसमध्ये त्या त्या साईटसवर विक्रीसाठी असलेल्या पुस्तकांचीच माहिती दिलेली दिसते. जी पुस्तके विक्रीसाठी नाहीत त्यांची माहिती उगाच का ठेवावी असा विचार कदाचित या वेबसाईटस करत असतील.

पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायविषयक माहिती देण्यासाठी काही प्रकाशकांकडून नियतकालिके प्रकाशित होत असतात. मात्र यात मुख्यत त्यांच्या स्वत:च्या प्रकाशनांची माहिती जास्त असते.

बाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. त्यात पुन्हा जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त प्रती छापायला लागणार आणि ते खर्चिक काम होणार. यावर एकच मार्ग… तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम !

यासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही असे हे मेगा-पोर्टल !

पुस्तक सूची

मराठी प्रकाशकांना या ग्लोबल जत्रेत सहभागी होण्यासाठी आता अतिशय अल्प आणि परवडणाऱ्या दरात आपल्या पुस्तकांची सूची तसेच पुस्तकांची विस्तृत  माहिती Google Search Engine मधून शोधता येईल अशाप्रकारे Text Format मध्ये येथे देणे शक्य आहे.

आपल्या सर्व पुस्तकांची सूची  :

यामध्ये प्रत्येक पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, मुखपृष्ठाचा फोटो, पृष्ठसंख्या, किंमत आणि पुस्तकाची थोडक्यात माहिती (Blurb) याचा समावेश असेल.

फक्त रु.१०,०००/- मध्ये (एकदाच भरणे)


प्रत्येक पुस्तकाची संपूर्ण माहिती :

यामध्ये पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, मुखपृष्ठाचा फोटो, पृष्ठसंख्या, किंमत, पाने, ISBN, लेखकाचा संपर्क, लेखकाचा परिचय, प्रकाशकाचा संपर्क, पुस्तकाचा परिचय, पुस्त परिक्षण वगैरे बरीच माहिती याचा समावेश असेल.
या माहितीचे आमच्या विविध माध्यमातून ३६५ x २४ x ७ Promotion केले जाईल.

फक्त रु.२,५००/- मध्ये (एकदाच भरणे)


अधिक माहितीसाठी संपर्क करा… 

आता जगभरातील युवा वाचकांना आकर्षित करा त्यांच्याच सोयीच्या ऑनलाईन माध्यमातून !!!  ३६५ x २४ x ७