पुस्तक परिचय-परिक्षणे

आठवणीतलं पुस्तक – ‘मुंबई दिनांक’

January 8, 2021 ninadpradhan 0

तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावर लक्षात येतं, ते हे की पुढचं आपलं सारं आयुष्य ‘मुंबई दिनांक:’ या दोन शब्दांनी सुरु होणार्‍या बातम्या लिहिण्यातचं गेलं, त्यामागे या पुस्तकाचीच प्रेरणा कारणीभूत होती. आज या पुस्तकाचं कथानक महाराष्ट्रातल्या घराघराला ठाऊक झालं आहे. १९७२ साली ‘मुंबई दिनांक :’ हे पुस्तक प्रकाशित झालं आणि नंतरच्या पाच वर्षातच साधूंची ‘सिंहासन’ ही आणखी एक कादंबरी आली. त्या दोहोंच्या उत्कृष्ट मिलाफातून जब्बार पटेल यांनी ‘सिंहासन’ हा चित्रपट काढला आणि या दोन्ही कादंबर्‍या घराघरांत जाऊन पोहोचल्या. […]