Sale!

१४, गारिबाल्डी स्ट्रीट

₹100.00 ₹0.00

गेली सात दशके जगभरातील विविध भाषी वाचकांना सतत भुरळ घालत राहिलेली एक अत्यंत उत्कंठावर्धक, खरीखुरी हेरकथा म्हणजे ‘१४ गारिबाल्डी स्ट्रीट’!

इस्त्राएलची मोसाद ही गुप्तचर यंत्रणा आज जगातील शक्तिशाली गुप्तचर यंत्रणांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. इस्त्राएलच्या शत्रूंच्या मनात कायम धडकी भरवणाऱ्या मोसादची ओळख जगाला करून दिली ती ‘१४ गारिबाल्डी स्ट्रीट’ने! १९६० सालच्या मे महिन्यात मोसादने अॅडॉल्फ आईशमन ह्या पळपुट्या जर्मन नाझी क्रूरकर्म्याचे अपहरण केले व ९००० मैलांचा प्रवास करून त्याला अर्जेंटिनामधून इस्त्राएलला नेले. ही धाडसी कारवाई साऱ्या जगाला थक्क करणारी होती.

लेखक : माधव भांडारी
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी

किंमत : रु. 400 / -

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.

SKU: 14-garibaldi-street-by-madhav-bhandari Category: Tags: ,

Description

गेली सात दशके जगभरातील विविध भाषी वाचकांना सतत भुरळ घालत राहिलेली एक अत्यंत उत्कंठावर्धक, खरीखुरी हेरकथा म्हणजे ‘१४ गारिबाल्डी स्ट्रीट’!

इस्त्राएलची मोसाद ही गुप्तचर यंत्रणा आज जगातील शक्तिशाली गुप्तचर यंत्रणांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. इस्त्राएलच्या शत्रूंच्या मनात कायम धडकी भरवणाऱ्या मोसादची ओळख जगाला करून दिली ती ‘१४ गारिबाल्डी स्ट्रीट’ने! १९६० सालच्या मे महिन्यात मोसादने अॅडॉल्फ आईशमन ह्या पळपुट्या जर्मन नाझी क्रूरकर्म्याचे अपहरण केले व ९००० मैलांचा प्रवास करून त्याला अर्जेंटिनामधून इस्त्राएलला नेले. ही धाडसी कारवाई साऱ्या जगाला थक्क करणारी होती.

अॅडॉल्फ आईशमन हा हिटलरचा अत्यंत विश्वासू सहकारी. नाझी जर्मनीच्या अधिकारी उतरंडीमध्ये त्याचा क्रमांक हिटलरपासून पाचवा होता. हिटलरने हाती घेतलेल्या ज्यूंच्या वंशविच्छेद कार्यक्रमाचा प्रत्यक्ष सूत्रधार आईशमन होता. किमान सत्तर लाख ज्यूंची अमानूष कत्तल केल्याचा लेखी दावा त्याने स्वत: केला होता.

दुसरे महायुद्ध संपता संपता आईशमन जर्मनीतून पळून गेला. दोस्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या युद्ध गुन्हेगारांच्या यादीत वरच्या क्रमांकावर असूनही अर्जेंटिनात पंधरा वर्षे दडी मारून बसण्यात तो यशस्वी झाला. मोसादने अखंड पाठलाग करून अखेर १९६० साली त्याला हुडकून काढले आणि अपहरण करून इस्त्राएलमध्ये नेले. मोसादचा शिल्पकार व प्रमुख इस्सार हारेल ह्याने स्वत: भाग घेऊन ती कामगिरी पार पाडली.

त्या धाडसी आणि अफाट कामगिरीचा हा खराखुरा वृत्तांत.

१४, गारिबाल्डी स्ट्रीट


हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.


लेखक : माधव भांडारी

इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी

 

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

लेखक संपर्क

पुस्तक वाचा

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.