
नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या चरित्राचा हा इतिहास…अनेक ग्रंथांचा आणि मौखिक परंपरेने चालत आलेल्या लोक साहित्याचा अभ्यास करून हे चरित्र लिहिले आहे
छ्त्रपती शिवाजी महाराज हे दिव्य दृष्टी असलेले एक थोर महापुरुष! त्यांनी एक एक रत्न शोधले.त्या पैकी एक तान्हाजी मालुसरे!
प्रथम उल्लेख: छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात तानाजी मालुसरे यांचा प्रथम उल्लेख येतो तो अफजलखान भेटी दरम्यान.प्रतापगडावर भेट ठरली.अफजल खानाच्या फौजेवर तुटून पडण्याचे ही ठरले. त्याच वेळी पाच सरदार आपले सैन्य घेऊन दबा धरून बसले.हल्ल्याचा इशारा होताच एक हजार सैनिकांचे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनी सर्वात आधी अफजल खानाच्या फौजेवर तुटून पडून लांडगेतोड केली.खानाच्या फौजेची दाणादाण उडवली.
तान्हाजी मालुसरे यांचा दुसरा पराक्रम इतिहासात नोंदवलेला आहे तो संगमेश्वर येथे सूर्यराव सुर्वे यांच्या मोठ्या संख्येने असलेल्या फौजेवर मिळवलेला विजय! रात्रीच्या अंधारात अतिशय काटक मारा करून तानाजीने हे युद्ध जिंकले.शत्रू सैन्य ही जिगरबाज होते.दुसऱ्या बाजूला लढणारा पिलाजी निळकंठराव लढत होता.पण सुर्वे सैन्याचा मारा खूपच तिखट होता.तनहाजी ची बाजू मात्र सैन्यावर तुटून पडली होती…पण सोबतचा सरदार पिलाजी निळकंठराव पराभूत मानसिकतेतून रणांगण सोडून पळत निघाला.पराभव निश्चित दिसत होता.तानाजीने या पाळणाऱ्या पिलाजीस पाठलाग करून पकडले.रणांगणावर परत आणले आणि मोठ्या दगडाला दोरीने बांधून ठेवले.त्याच्या समोर कसे लढायचे व जिंकायचे हे दाखवले.या प्रसंगात छ. शिवाजी महाराजांनी तान्हाजी मालुसरे यांचे खूप कौतुक केले.
कोंढाणे जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांची च का निवड केली?:त्या साठी लेखकाने एक अस्सल पत्र पुस्तकात छापले आहे.त्याचा मोडी लिपीतील फोटो ही आहे. ३ एप्रिल १६६३ ला महाराजांनी पेशवे मोरोपंत पिंगळे व सोनदेव मुजुमदार यांना लिहिलेल्या पत्रात कोंढाणा किल्यावर फितुरी आहे.त्या साठी तान्हाजी मालुसरे यांना पाठवण्यात आले.या काळात तानाजी मालुसरे यांना गडाची खडा न खडा माहिती झाली.
पुढे तान्हाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध झालेले किल्ले कोंढाणा हे सिंहगड म्हणून आधीच प्रसिद्ध होते हे सप्रमाण लेखकाने दाखवले आहे.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे यात तानाजी मालुसरे यांच्यावरील सर्वात जुना पोवाडा दिला आहे.शाहीर तुलसीदास यांचा हा पोवाडा आहे.जो सापडत नव्हता. या पावड्यात एकूण ५५ चौक आहेत.तसा हा मोठा आणि चेतना निर्माण करणारा पोवाडा आहे.
या पुस्तकात तानाजी मालुसरे यांचा वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथात कोठे आणि कसा उल्लेख आला आहे ते ही लिहिले आहे.श्री शिवभारत मधील श्लोक आणि अर्थ दिला आहे.
या पुस्तकात आता तान्हाजी मालुसरे यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या स्मारकांची ही माहिती दिली आहे.
हे पुस्तक कादंबरी नाही. चरित्र आहे.
पुस्तक: नरवीर तान्हाजी मालुसरे
लेखक: महेश तेंडुलकर
प्रकाशन: स्नेहल प्रकाशन
पृष्ठ:१०८
मूल्य:१३०₹ टपाल :२०₹ एकूण:₹१५०/
Leave a Reply