अहिल्याबाई होळकर

30.00

पुण्यश्लोक, लोकमाता, तत्त्वज्ञानी राणी, मुत्सद्दी राज्यकर्ती इ. अनेक उपाधी ज्यांच्या नावाआधी लावल्या जातात त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर, तेजस्विनी अहिल्याबाई म्हणजे एकाच व्यक्तीत अनेक सद्गुण असलेला जणू दैव चमत्कारच होत्या. प्रेमळ, धार्मिक, चतुर, बुद्धिमान, शूर, पराक्रमी, द्रष्ट्या असे एक ना अनेक अंगांनी त्यांच व्यक्तिमत्व बहरलेले होते. केवळ आपल्या प्रांतापुरता विचार न करता संपूर्ण भारतभरात त्यांनी कामे केली.

त्यांनी बांधलेली मंदिरे, तलाव, विहिरी, नद्यांवरील घाट हे आज दोनशे वर्षांनंतरही त्यांच्या कार्याची ग्वाही देतात. अहिल्याबाई हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होते.

लेखक : मृण्मयी पाटील / Mrunmayi Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30