धुनी

150.00

माणसाचा देह तसा तुटक तुटक असतो; कष्टात हे फार खरं असतं. त्याच कष्टातून काव्य फुलू लागलं की मग मात्र देह अवघा बनतो आणि इंद्रधनूच्या झोपाळ्यावर झुलू लागतो; भावकाव्य हाच तो देह! सुरेश सावंत हा आमचा कविमित्र सखा असण्यात फार उदास आणि करुण आहे; त्याची सखीही त्याला समाधानानं समजून घेणारी आहे आणि आहे ती अखेर कविताच आहे. त्या सखीचा हा प्रियकर आहे; अवघ्या देहासह म्हणूनच !

लेखक : सुरेश सावंत / Suresh Sawant
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 144
किंमत : रु. 150