डॉ. अब्दुल कलाम: चरित्र आणि कार्य

30.00

भारताचे राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर पोहचलेले डॉ. अब्दुल कलाम हे विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे कार्य भारतीयांना सतत प्रेरणादायी ठरणारे आहे. ‘मिसाईल मॅन’ ही त्यांची जगभरात मान्य झालेली ओळख म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष आहे.

तामिळनाडूतील ‘रामेश्वरम’ हे भारतात प्रसिद्ध असलेल्या चारी धामांपैकी एक सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. १५ ऑक्टोबर १९३१ या दिवशी डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म याच तीर्थक्षेत्री झाला. अबुल पाकिर जैनुलाबद्दिन अब्दुल कलाम असे त्यांचे पूर्ण नाव. डॉक्टर ही त्यांना मिळालेली पदवी होती. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम या नावाने ते जगभर ओळखले जातात.

लेखक : सुमती पाटील / Sumati Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
किंमत : रु. 30