Sale!

आय. सी. ८१४

100.00 75.00

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आय. सी. ८१४ विमानाचं अपहरण झालं, तेव्हा ‘एन्टेबी’सारखी कारवाई केली जाईल, असं अनेकांना वाटत होतं. गुप्तचरांच्या आघाडीवर तशी तयारी होती, पण माशी कुठे शिंकली ?

अमृतसरच्या राजा सांसी विमानतळावर कमांडोजचं पथक पोहोचलं, पण दरम्यान ‘इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं लाहोरच्या दिशेनं उड्डाण केलं होतं.

त्या कारवाईत विघ्न आणणारे कोण होते ? तो खोटा फोन कोणाचा होता ?

या आणि अशा बऱ्याच खळबळजनक माहितीवर आधारित काल्पनिक आणि वास्तव यांचा हा सुरेख ‘कल्पास्तव’.

अरविंद व्यं. गोखले यांची थरारक कादंबरी

लेखक : अरविंद व्यं गोखले / Arvind V Gokhale

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ७५/-

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: ic814-by-arvind-gokhale Category:

Description

वास्तविक मला आय. सी. ८१४ या माझ्या कल्पास्तवाची ही आकाश आवृत्ती (इ बुक) निघेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यासाठी मला पहिल्यांदा नेटफ्लिक्सचे आभार मानायला हवेत.

आता हेच पाहा ना, आय. सी. ८१४ ही कादंबरी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाच्या नाट्यावर अक्षरश: दोन-तीन आठवड्यात लिहून मी पूर्ण केली. २४ डिसेंबर १९९९ रोजी सुरु झालेले हे अपहरणाचे नाट्य ३१ डिसेंबर १९९९ च्या उत्तररात्री म्हणजे २००० च्या पहाटे संपले. ते जसे घडले तसे या कादंबरीत म्हणजेच या कल्पास्तवात दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे.
फक्त शेवट हा समस्त भारतीयांना जसा व्हावा असे मनातून वाटत होते तसा घडवलेला आहे.

नेटफ्लिक्सने त्यावर काही भागांची मालिका काढली आणि त्यातल्या भोला, शंकर आदि पात्रांबाबत चर्चा सुरु झाली. ती खरी आहेत की ती अवास्तव आहेत, असे विचारले जाऊ लागले. चॅनेलवरही त्याची चर्चा रंगली.

मी माझ्या कादंबरीची आठवण ठेवून एक कहाणी माझ्या फेसबुक किनाऱ्यावर टाकली. ती वाचून काहीजणांनी माझी मुलाखत त्यांच्या त्यांच्या चॅनेलवर घेतली. त्याबरोबर अनेकांनी ही कादंबरी आपण मागे वाचली, पण आता आठवत नसल्याचे सांगितले. अनेकांना ती पुन्हा वाचावीशी वाटली, माझ्या या कादंबरीची उजळणी करावीशी वाटली, यातच या कादंबरीची तथा या कल्पास्तवाची किमया म्हणायला हवी.

त्यातच माझे स्नेही श्री. निनाद प्रधान यांनी त्याबद्दलचा आग्रह धरला म्हणूनच केवळ ती पूर्ण करता आली.

जमिर या हिंदी चित्रपटातला शेवट हा माझ्या कादंबरीच्या शेवटाशी जुळणारा आहे. म्हणूनच शेवट आताच सांगत नाही. तुम्ही पण कोणाला हा शेवट सांगू नका आणि प्रारंभ चुकवू नका.
पाकिस्तानच्या अभ्यासामुळेच केवळ मला ही कादंबरी जमली आणि अल्पावधीत ती पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केली.

तब्बल चोवीस वर्षांपूर्वीची ती कहाणी जशीच्या तशी पुन्हा एकदा वाचकांसमोर वेगळ्या स्वरूपात येत आहे. आपण तिचा आनंद घ्याल ही खात्री आहे.

अरविंद व्यं. गोखले

लेखक : अरविंद व्यं गोखले / Arvind V Gokhale

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १००/-

सवलत किंमत : रु. ७५/-

ic814
Arvind Gokhale
Marathisrushti

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

लेखक संपर्क

श्री. अरविंद व्यं. गोखले

‘सरस्वती’, एन-४ निरंत वसाहत,
बिबवेवाडी, पुणे – ४११०३७.

मोबाईल : 98225 53076