इंदिरा गांधी : चरित्र आणि कार्य

30.00

स्वतंत्र भारतामध्ये कर्तृत्ववान महिला म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्या थोर महिला होऊन गेल्या, त्यात श्रीमती इंदिरा गांधी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. राजकारणाचा नुसता वारसा असून चालत नाही तर समर्पित भावनेने जीव ओवाळून टाकणे हीच खरी राष्ट्रभक्ती असते. भारतासारख्या पुरुषप्रधान देशात जेव्हा एक महिला आपल्या कर्तृत्वाने विसाव्या शतकात जगात वेगळी छाप सोडते, तेव्हा त्यांचे चरित्र नक्कीच वादातीत ठरते.

‘इंदिरा इज इंडिया’ अशी व्याख्या एकेकाळी राजकीय धुरंदर नेत्यांनीच केली होती. देशातील जनतेचा सर्वांगिण विकास व्हावा, त्याचबरोबर परकीय देशांशीसुद्धा संबंध सुरळीत रहावेत, यासाठी इंदिराजींनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

लेखक : मृण्मयी पाटील / Mrunmayi Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30