मी तो हमाल

150.00

अनुभव ऐकण्यासारखे असतात हे कोणाला खरं वाटणार नाही. हमालापासून कोणाला काही मिळेल याबद्दल कोणाला खात्री असणार? तरीही मी माझे अनुभव सांगत आहे. माझं भरलेलं मन मला रितं करायचं आहे. संघटना उभारणीच्या वेळेस मी माझे अनुभव कामगारांपुढे सांगायचो, त्यावेळेस ते अनुभव थोड्याफार फरकाने त्यांना स्वतःचेच वाटायचे, काय? ऐकताना उंच कान करून ते ऐकायचे, आणि ह्या आठवणी आप्पांनी जपल्या पाहिजेत, असं त्यांना वाटायचं. त्यातील काहीजण तर मी आठवणी लिहून काढाव्यात म्हणून आग्रह धरायचे.

लेखक : आप्पा कोरपे / Appa Korpe
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 124
किंमत : रु. 150