ओंजळीतील मोती
₹120.00
जीवनातील सुखाचे, आनंदाचे दिवस भुर्रकन उडून जातात; पण दुःखाचे दिवस युगासारखे वाटतात. कोण आपल्याला हे बळ देतो, आपल्याला सुख-दुःख देणारा कोण तो? विधाता की आपले प्रारब्ध? सुखात सारे वाटेकरी असतात, दुःखात मोजकीच माणसे साथ देतात, पण त्यानेही आपल्याला बळ मिळते.
सुखाच्या दिव्यातील तेल संपून वात विझते तेव्हा दुःखाची चाहूल लागते, दुःख विसरायचे तर आपणही जळायचे असते आणि मनात जळता जळता पाठीमागच्यांना सावरायचे असते. याच भावनेतून माझ्या ‘ओंजळीतील मोती’ या पुस्तकातील लेख आणि कविता लिहून झाल्या आहेत. त्यात जीवनातील चांगले वाईट अनुभव नमूद केले आहेत.
लेखक : प्रमिला रासकर / Pramila Raskar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 80
किंमत : रु. 120