पहिला हिंदुहृदयसम्राट

200.00

या पुस्तकाचे स्वरूप केवळ इतिहास असे न येता एखाद्या व्यक्तिचित्राचे व उत्कंठा वाढविणाऱ्या कादंबरीसारखे झाले आहे. त्यात उत्कंठा वाढविणारे नाट्य आहे. हे सारे लेखन फार सशक्तपणे उभे करण्यात ते यशस्वी झाले आहेत. या पुस्तकातून आपणास १९४० नंतरच्या भारतीय कॉंग्रेस, गांधी, हिंदुमहासभा, मुस्लिम लीग यांचा आचारविचार पहावयास मिळतो. सावरकरांचा प्रभाव हाही या पुस्तकाचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा भाग आहे. ओगले यांचा इतिहासाचा अभ्यास या पुस्तकातून आपल्याला दिसतो.

लेखक : अनंत ओगले / Anant Ogale
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations
किंमत : रु. २००/-

Category: Tag:

Description

” या पुस्तकाचे स्वरूप केवळ इतिहास असे न येता एखाद्या व्यक्तिचित्राचे व उत्कंठा वाढविणाऱ्या कादंबरीसारखे झाले आहे. त्यात उत्कंठा वाढविणारे नाट्य आहे. हे सारे लेखन फार सशक्तपणे उभे करण्यात ते यशस्वी झाले आहेत. या पुस्तकातून आपणास १९४० नंतरच्या भारतीय कॉंग्रेस, गांधी, हिंदुमहासभा, मुस्लिम लीग यांचा आचारविचार पहावयास मिळतो. सावरकरांचा प्रभाव हाही या पुस्तकाचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा भाग आहे. ओगले यांचा इतिहासाचा अभ्यास या पुस्तकातून आपल्याला दिसतो.

सर्व उपयुक्त सामग्रीचा आपण अन्वयार्थ लावून लिहिलेले पुस्तक या घटनांवर नव्याने पुन्हा प्रकाश पडणारे आहे. गांधी हत्येत निष्कारण सावरकरांना गुंतवून एक प्रमुख विरोधी पक्ष आणि सावरकरांसारखा नेता जाणीवपूर्वक संपविण्यात आला. कॉंग्रेस सरकारकडून सावरकरांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. आपण लिहिलेल्या पुस्तकाबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा !!

अनंत शंकर ओगले यांनी य अवघड विषयाला हात घातल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम कौतुक करावेसे वाटते ! कारण ललित साहित्याच्या अंगाने सावरकरांच्या संपूर्ण आयुष्याचा आढावा जवळपास कोणी आजपर्यंत घेतलेला नव्हता, पण येथे सावरकरांचे क्रांतीकार्य , अंदमानची जीवघेणी काळी यात्रा, त्यांची समाजसुधारणा, विज्ञानवादी दृष्टीकोन, हिंदुत्वाचे राजकारण, हिंदुस्थानची फाळणी. इतकेच काय तर गांधीहत्येचा नाजूक विषय, गांधी-नेहरूंचा त्यांच्याविषयीचा आकस, गांधी हत्त्योत्तर सावरकरांचे अखेरचे जीवन…. काहीही अस्पर्श या पुस्तकाने ठेवलेले नाही ! हे सारे अत्यंत शैलीदार भाषेत ओगले यांनी मराठी वाचकांपुढे उभे केलेले आहे.

लेखक : अनंत ओगले / Anant Ogale
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations
किंमत : रु. २००/-

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्कव्यास क्रिएशन्स्
डी-१, सामंत ब्लॉक्स, श्री घंटाळी देवी मंदिर पथ, नौपाडा, ठाणे (प.) ४०० ६०२.
दूरध्वनी : २५४४७०३८ / ९९६७८३९५१०
Email : info@vyascreations.comvyascreations@gmail.com
Facebook : www.facebook.com/joinvyascreations