Sale!

शिवलिंगाचे रहस्य

100.00 80.00

“शिवलिंगाचे रहस्य” या कादंबरीतील महायुध्दाचे व संघर्षाचे वर्णन लेखक समीर वेंगूर्लेकर यांनी अतिशय प्रभावीपणे केलेले आहे. या कादंबरीचा स्पर्श वर्तमानातील अपप्रवृत्ती व त्याच्या विरुध्द उभा राहिलेला सत्याग्रह, आंदोलने या वास्तवाशी जुळतो. सामान्य माणसाला लढण्याचे बळ देणारी ही कथा असून, पौराणिक विषयांच्या व्यासपीठावरुन शब्दातीत करण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे. नवपिढीतील युवा वाचकांना भावणारे रहस्यमय व उत्कंठावर्धक नाटय या कथेमध्ये लेखकाने रेखाटलेले असून, आध्यात्मिक रुची निर्माण करणारे आहे

लेखक : समीर शशिकांत वेंगुर्लेकर
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ८०/-

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.

SKU: shivlingache-rahasya-by-sameer-vengurlekar Category: Tags: ,

Description

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.


लेखक : समीर शशिकांत वेंगुर्लेकर

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

लेखक संपर्क

पुस्तक वाचा

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रस्तावना

या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य, लेखक-कवी विठठल नारायण कदम यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचा.


(सत्य, प्रेम व स्वत:वरचा विश्वास जगातील सर्वात मोठी शक्ती!)

जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे सत्य, प्रेम आणि स्वत:वरचा विश्वास हीच आहे. शिवलिंगाचे रहस्य ही एक साध्या मुलाची असामान्य प्रवास कथा आहे. कथेचा नायक नितीन हा वरकरणी साधा, आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा, शांत स्वभावाचा मुलगा आहे. पण त्याच्या जन्मातच एक गुढता दडलेली आहे. त्याच्या सभोवताली फार मोठी दैवी शक्ती फिरत आहे, जी त्यालाच माहित नसते. त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याला शिवलिंग मिळालेले असते, पण ते सामान्य नसून त्यात प्रचंड दैवी उर्जा आहे असे मानले जात असते.

नितीन हा या रहस्य कथेचा नायक असून नितीनच्या आयुष्यात अंधाराचा प्रवेश होतो आणि कथेत हळूहळू अनेक विचित्र घटना घडू लागतात. शर्वरी ही नितीनवर मनापासून प्रेम करणारी मुलगी आहे. पण तिच्यात त्रिपुरासुर दैत्याची सावली काम करत असते. काहीवेळा तिचा भयावह चेहरा समोर येतो. जेडी हा यातील खलनायक अत्यंत क्रुर, अर्धदैत्य, अलौकिक शक्तीने संपन्न असा प्राणी आहे. जेडी आणि त्रिपुरासुर या कथेत नितीनचे मुख्य विरोधक आहेत. अशोक सुंदरी ही नितीनची दैवी मार्गदर्शक आहे, तिच्या आगमनाने नितीनचे जीवन बदलते. अशोक सुंदरी नितीनला दैवी, जलचक्र आणि संकटातून बचाव करण्याचा मार्ग दाखवते.

“शिवलिंगाचे रहस्य” या कथानकातील महायुध्दाचे व संघर्षाचे वर्णन लेखक समीर वेंगूर्लेकर यांनी अतिशय प्रभावीपणे केलेले आहे. या कथेचा स्पर्श वर्तमानातील अपप्रवृत्ती व त्याच्या विरुध्द उभा राहिलेला सत्याग्रह, आंदोलने या वास्तवाशी जुळतो. सामान्य माणसाला लढण्याचे बळ देणारी ही कथा असून, पौराणिक विषयांच्या व्यासपीठावरुन शब्दातीत करण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे. नवपिढीतील युवा वाचकांना भावणारे रहस्यमय व उत्कंठावर्धक नाटय या कथेमध्ये लेखकाने रेखाटलेले असून, आध्यात्मिक रुची निर्माण करणारे आहे. “शिवलिंग” हे मानवी उत्पत्तीचे सृजनाचे प्रतिक असून, सृष्टीचे रुप आहे. अनादी काळाला या कथेतून लेखकाने वर्तमानातील वास्तवाला भिडविले आहे. निश्चितच वाचकाला ही कथा व रहस्य स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे व वाईट प्रवृत्ती विरुध्द लढण्याचे भान व बळ देईल इतका आशावाद निश्चित समीर वेंगूर्लेकर यांच्या लेखणीने निर्माण केलेला आहे. उत्तरोत्तर लेखकाची प्रतिथयश प्रतिभा व साहित्य लेखणी भरात येईल व आपल्याला नवनवीन साहित्य प्रकारातील नवसृजन अनुभवयास मिळेल हे निश्चित.

विठठल नारायण कदम
लेखक, कवी
सदस्य – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ