श्री गणपती अथर्वशिर्ष

0.00

SKU: ganapati-atharvasheersha-subhash-naik Category: Tag:

Description

श्रीगणेश, आणि श्रीराम, या दैवतांबद्दल  सगळ्यांना बरीच माहिती असते. त्यामुळे, त्या विषयात न शिरतां, मी फक्त माझ्या भाषांतर-प्रक्रियेबद्दल लिहीत आहे.

१९८०/ १९९० च्या दशकांत मी ‘श्रीगणपतिअथर्वशीर्षा’चें आणि ‘श्रीरामरक्षे’चें मराठीत भाषांतर केलें. तें कां, तर ही दोन, अतिशय लोकप्रिय अशी स्तोत्रें  आहेत.  हल्ली अनेक लोकांना संस्कृतचें ज्ञान नसतें, व अशा मंडळींना ही स्तोत्रें मराठीत उपलब्ध व्हावीत हा  हेतू.  कुठल्याही प्रकारें यामागील हेतू व्यावसायिक नाहीं.

गणपतिअथर्वशीर्ष तथा रामरक्षा या दोहोंचेंही मी प्रत्येकी दोन तर्‍हेनें भाषांतर केलें. रामरक्षेचें, ‘समश्लोकी मराठी भाषांतर’ व ‘सरल मराठी पद्यानुवाद’ असें , आणि अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’  व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन-दोन प्रकारें अनुवाद केले. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल. रामरक्षेत श्लोक आहेत ; ते बहुतांशी अनुष्टुभ् छंदात आहेत, पण कांहीं श्लोकांमध्ये इतरही वृत्तें वापरलेली आहेत. त्यामुळें, तें भाषांतर ‘समश्लोकी’ करणें स्वाभाविकच होतें. अथर्वशीर्षातील कांहीं भाग पद्यात्मक आहे तर कांहीं गद्यात्मक. त्यामुळे, त्याच्या भाषांतराला ‘समश्लोकी’ म्हणतां येणार नाहीं. परंतु, प्रत्येक स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हटलें जातें. मी अथर्वशीर्षाच्या भाषांतरमध्ये मूळ संस्कृत स्तोत्राची ‘लय’ शक्यतो सांभाळली, म्हणून तें भाषांतर ‘सम-लय’. कुणां वाचकाला / पाठकाला कदाचित त्याहून सोपें भाषांतर हवें असूं शकतें, म्हणून दोन्ही स्तोत्रांची ‘सरल’ म्हणजे सोपी भाषांतरेंही  केली. रामरक्षेच्या भाषांतराला सुप्रसिद्ध विद्वान, संस्कृत, पाली, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांचे ज्ञाते, आणि प्रकांडपंडित मध्ययुगीन कवी मोरोपंत यांचें वंशज डॉ. मो. दि. पराडकर यांचा ‘पुरस्कार’ (प्रास्ताविक) लाभले, हें माझें महद्.भाग्य.

रामरक्षेचे दोन्ही प्रकारचे अनुवाद आणि अथर्वशीर्षाचें ‘सम-लय’ भाषांतर, हे तिन्ही मागेंच प्रिंटेड पुस्तकरूपानें प्रसिद्ध झालेले आहेत. अथर्वशीर्षाचें ‘सरल पद्यरूपांतर’ कांहीं वर्षांपूर्वी एका पाक्षिकाच्या ‘गणेश दैवत विशेषांका’मध्ये प्रसिद्ध झालेलें आहे,  परंतु, पुस्तकरूपानें तें अद्याप प्रसिद्ध झालेलें नव्हतें.  त्याची ‘लिमिटेड प्रिंट एडिशन’ काढायचा माझा मानस आहे. तूर्तास, अथर्वशीर्षाचे दोन्ही प्रकारचे अनुवाद, मूळ संस्कृत स्तोत्रासह देत, ही एक    ‘ई-बुक’ आवृत्ती काढलेली आहे.  वाचकांना व पाठकांना ती उपयुक्त वाटेल, अशी  आशा आहे.


लेखक : सुभाष नाईक / Subhash Naik

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

मोफत वितरणासाठी

Shree Ganapati Atharvasheersha | Subhash Naik | Marathisrushti

लेखक संपर्क

लेखक : सुभाष नाईक / Subhash Naik

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com