श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग

160.00

केवळ स्वत:च्या आविष्कारसामर्थ्यावर सातशे वर्षे जिवंत राहिलेला चोखा हा एकमेव मराठी कवी ठरतो. चोखामेळा आणि त्याचे कुटुंबीय हे केवळ वारकरी विठ्ठलभक्त म्हणून किती महत्त्वाचे असतील ते असोत, मराठी वाङ्मयीन संस्कृतीची तिच्या उगमापासूनची एक मोठी मर्यादा स्पष्टपणे दाखवत राहाण्याचे ऐतिहासिक कार्य ह्या मंडळींनी निश्चित पार पाडले आहे. चोखामेळा हा मराठी समाजाच्या प्रारंभीच्या जातीजमातींच्या कडबोळ्यातला भक्कम एकजिनसीपणाचा आधार देणाऱ्या सुरवातीच्या काही थोर प्रतिभावंतापैकी एकप्रमुख नायक आहे. त्याच्याबद्दल त्याचा क्रांतिकारक गुरुमित्र नामदेव याच्यापासून तर महादेव गोविंद रानडे यांजपर्यंतच्या सर्वच प्रतिभवंतांनी मुक्तपणे प्रशंसोद्गार काढलेले आहेत.

लेखक : भालचंद्र नेमाडे, एस.बी. कदम / Bhalchandra Nemade, S. B. Kadam
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 233
किंमत : रु. 160