तारकर्ली

325.00

कोकणच्या मातीवर पोसलेली, त्या मातीशी इमान राखणारी आणि तिच्याशी एकजीव झालेली मधु मंगेश कर्णिक या ज्येष्ठ लेखकाची प्रतिभा… या प्रतिभेचा ‘तारकर्ली’ ही कादंबरी म्हणजे नवा सर्जनशील उन्मेष!

कोकणचा तजेलदार निसर्ग-तांबडी माती, सह्याद्रीचे कडे, खाडी, समुद्र…या समुद्राची, निसर्गाची अनंत अद्भुत रूपं अनुभवणारी किनाऱ्यालगतची छोटी गावं. त्यांतलंच तारकर्ली हे एक वालुकामय गाव.

निसर्ग आणि माणूस यांच्यातलं अतूट नातं संपवू पाहणारा, निसर्गाच्या रम्यतेला झाकोळून टाकणारा बकाल नागरसंस्कृतीचा नवा जीवनप्रवाहही ती ठसठशीतपणे अधोरेखित करते. प्रादेशिकतेची वेस ओलांडत एका व्यापक वास्तवाला अलगद जाऊन भिडते आणि वाचकाला अस्वस्थ करून टाकते.

मराठी साहित्यात म्हणूनच ‘तारकर्ली’ या कादंबरीचं स्थान महत्त्वाचं ठरावं.

लेखक : मधु मंगेश कर्णिक / Madhu Mangesh Karnik
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh

पाने : २०४
किंमत : रु. ३२५/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१९०-७

Description

कोकणच्या मातीवर पोसलेली, त्या मातीशी इमान राखणारी आणि तिच्याशी एकजीव झालेली मधु मंगेश कर्णिक या ज्येष्ठ लेखकाची प्रतिभा… या प्रतिभेचा ‘तारकर्ली’ ही कादंबरी म्हणजे नवा सर्जनशील उन्मेष!

कोकणचा तजेलदार निसर्ग-तांबडी माती, सह्याद्रीचे कडे, खाडी, समुद्र…या समुद्राची, निसर्गाची अनंत अद्भुत रूपं अनुभवणारी किनाऱ्यालगतची छोटी गावं. त्यांतलंच तारकर्ली हे एक वालुकामय गाव. इथल्या मच्छीमार समाजाचं अवघं जगणं म्हणजे समुद्रावरचं जगणं. रापण लावून फडफडते मासे पकडून सुशेगात जगणारा हा इथला मच्छीमार! पण आधुनिकीकरणाच्या ओघात रापणीला आव्हान निर्माण झालं ते पर्ससिन या यांत्रिक बोटीचं.

रापण म्हणजे चिवट धाग्यांनी बनलेली जाळी. अर्थात परंपरागत, सांस्कृतिक मूल्यांचेच हे एका अर्थाने अतूट धागे आणि यांत्रिक बोटी म्हणजे बाजारू, व्यापारीकरणाचे नवे संस्कृतीकरण. दोन संस्कृतींमधला हा तीव्र जीवनसंघर्ष प्रतिकात्मक रीत्या ‘तारकर्ली’ ह्या कादंबरीत उलगडत जातो. वेगवेगळ्या पात्रांमधील ताणेबाणे रेखाटत, वालुकामय भूखंड, खाडी, समुद्र यांची सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीवरची ही कहाणी त्यातून जिवंत होत जाते.

निसर्ग आणि माणूस यांच्यातलं अतूट नातं संपवू पाहणारा, निसर्गाच्या रम्यतेला झाकोळून टाकणारा बकाल नागरसंस्कृतीचा नवा जीवनप्रवाहही ती ठसठशीतपणे अधोरेखित करते. प्रादेशिकतेची वेस ओलांडत एका व्यापक वास्तवाला अलगद जाऊन भिडते आणि वाचकाला अस्वस्थ करून टाकते.

मराठी साहित्यात म्हणूनच ‘तारकर्ली’ या कादंबरीचं स्थान महत्त्वाचं ठरावं.

लेखक : मधु मंगेश कर्णिक / Madhu Mangesh Karnik
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh

पाने : २०४
किंमत : रु. ३२५/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१९०-७

Taarkarli
Mauj Prakashan Gruha

लेखक परिचय

एक्स १८, मार्व्हल, फ्लॅट नं. ४०१, शास्त्री नगर, अंधेरी (प), मुंबई ४०००५३

फोन - (०२२) २६३६०४६० / २६३६०४४० / ९९२०३२३६६७ 

प्रकाशक संपर्क

मौज प्रकाशन गृह, मुंबई
१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,
विलेपार्ले (प), मुंबई
इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९