
वाहते अंतर
वाहते अंतर’मध्ये सुमती लांडे यांच्या कवितेचा एक नवा चेहरा आपल्याला दिसतो. कवीची उत्कट भाववृत्ती आणि आपलं आतलं काहीही सांगायचं नाही अशा दोन परस्परविरोधी भावांच्या झगड्यात, एक प्रकारच्या मानसिक कल्लोळातून; त्याच्या चरकातून त्यांची कविता प्रकटलेली आहे.
कवितेत सत्याखेरीज काहीच सांगता येत नाही आणि आपलं सत्य तर आपलं खाजगी असलेलंच बरं या वृत्तींमधून हा चरक तयार होतो.
ही कविता कमळकाचा मधल्या कवितांपेक्षा अधिक खुलेपणानं प्रगटली आहे.
लेखक : सुमती लांडे / Sumati Lande
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 88
किंमत : रु.