कार्यकर्ता
कार्यकर्ता . JPG
मा.दत्तोपंत ठेंगडीजी यांच्या जयंती निमित्त!
“कार्यकर्ता”
“कार्यकर्ता”, हे पुस्तक हे एक आधुनिक उपनिषद् म्हणावे तसे आहे. आदरणीय मा.गो. वैद्य यांनी या पुस्तकाला उपनिषद् म्हटले आहे.हे पुस्तक सर्व प्रकारच्या सार्वजनिक जीवनातील कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी उपयोगी आहे.उपनिषद् जसे पंथ आणि उपासना निरपेक्ष आहेत तसेच कार्यकर्ता हे पुस्तक आहे.ते जगातील सर्व संघटनाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे आहे. लेखक कै. दत्तोपंत ठेंगडी हे आधुनिक काळातील ऋषी! १० नोव्हेंबर त्यांची जयंती! त्या निमित्ताने त्यांच्या पुस्तकाचे चिंतन!
कार्यकर्ता हा कोणत्याही संघटनेचा प्राण असतो. एखादे संघटन कसे आहे हे त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे पाहून समाजात त्याची ओळख निर्माण होते.त्याचा ठसा पडला जातो.ते संघटन मग कोणतेही असू दे अध्यात्मिक,सांस्कृतिक ,सामाजिक, शैक्षणिक, राजकीय किंवा मग गुन्हेगारी क्षेत्रातले असेल. समरस आणि समर्पित कार्यकर्ता हीच त्या त्या संघटनेची खरी शक्ती असते.नेता बदलला तरी कार्यकर्ता हा त्या विचारला त्या तत्वाला जेंव्हा धरून राहतो तेंव्हा ते संघटन दीर्घकाळ कार्य करते.
प्रत्येक नेत्याला आपला कार्यकर्ता स्वतः साठी प्रामाणिक असावा वाटतो.स्वतः घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला त्याचा पाठिंबा असावा असे वाटते.असे हे केवळ प्रतिमापूजन सारखे असते.असे नेते आणि प्रसंगी उभे राहणारे कार्यकर्ते हे हंगामी ठरतात.यांचा प्रभाव अल्पकाळ टिकतो.
संघटनेचे अधिष्ठान ,कार्यपद्धती, हेतू हे जर व्यापक आणि जनहितार्थ असतील तर ते एका अर्थाने भगवंताचे कार्य असते.असे असले तरीही ते कार्य प्रत्यक्ष करणारा कार्यकर्ता तसा निर्माण झाला पाहिजे.कार्यकर्ता निर्माण अर्थात व्यक्ती निर्माण! हे व्यक्ती निर्माण अनेक चांगला हेतू आणि अधिष्ठान असून ही अनेक धार्मिक संघटनांना जमले नाही.संप्रदाय हा व्यक्तीपुजक झाला. डेरे हे विचाराचे न राहता बाबांचे झाले…मग या नेत्यांचे लाड पुरवताना संघटन हे क्षीण होत गेल्याचे उदाहरणे आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात कार्यकर्ता हा सर्वात महत्वाचा घटक आहे.या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता एकनिष्ठ राहून आयुष्यभर मिळेल ते कार्य करतो.नेता कोण आहे हे त्याच्या डोक्यात कधी प्रश्न निर्माण होत नाहीत.म्हणून नेतृत्व बदल सतत आणि सहज घडतात.येथे नेतृत्व कर्तुत्वावर ठरते.याच विचाराचा प्रभाव राजकीय व अन्य समविचारी क्षेत्रात ही उमटतो. नेतृत्वात बदल होतो तेंव्हा कोठे संघर्ष निर्माण होत नाही….
कार्यकर्ता हा त्या त्या संघटनेची खरी शक्ती असते.व्यवहार हा कार्यकर्त्याची शक्ती असते.व्यवहारात विचार प्रगट होणे हे फार महत्वाचे.’बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले!’ असे संतांनी त्यामुळे सांगून ठेवले आहे.
कार्यकर्ता त्याचे अधिष्ठान ,व्यवहार आणि व्यक्तिमत्व या गोष्टींचा सखोल अभ्यास , चिंतन आणि त्यातून प्रगट मांडणी मा. तत्तोपंत ठेंगडी यांनी वेळोवेळी केली आहे. आज १० नोव्हेंबर मा. दत्तोपंत ठेंगडी यांची जयंती आहे…..त्यांनी निर्माण केलेले संघटन सर्वात मोठे आणि व्यापक ठरले आहेत.त्यांचे नाव कदाचित सर्वांना माहिती ही नसेल… पण त्यांनी उभारलेले स्वदेशी जागरण मंच, अखिल भारतीय मजदुर संघ, अखिल भारतीय किसान संघ सारखे संघटन सर्वांना माहिती आहेत.हे एकच उदाहरण पुरेसे आहे….कार्यकर्ता कसा असावा याचे!
पुस्तक: कार्यकर्ता
लेखक: द.बा. ठेंगडी
संकलन: बापू केंदुरकर
प्रकाशन: भारतीय विचार साधना
पृष्ठ:३२० मूल्य:३००₹ टपाल:४०₹
हिंदी अनुवाद मूल्य:२००₹ टपाल:४०₹
खरेदीसाठी व्हॉटसअप करून संपर्क साधावा
मो:9421605019
रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय