चक्रव्यूह

350.00

रंगनाथ पठारे यांच्या कथनात्मक गद्यात ‘चक्रव्यूह’ ह्या कादंबरीला मी मध्यवर्ती स्थान देतो, ते ती खऱ्या अर्थाने प्रायोगिक आहे म्हणून तसेच ती आपल्या संस्कृतीच्या सांप्रतच्या कोंडीत झालेल्या एका वैज्ञानिकाच्या शोकिांतिकेची बयक्तिक आणि सामूहिक व्यवहारांच्या संदर्भात मांडणी करते म्हणून.। या शोकांतिकेचा नायक सक्सेना हा परमाणू – विज्ञानात संशोधन करणारा आहे आणि त्याच्या ऊर्जेचा अविष्कार आणि लोप सुद्धा एखाद्या परमाणूच्या अस्तित्वासारखा भंगुर आहे. त्याच्या भोवतालचे स्थूल विश्व आपला समाज आणि त्यातल्या उपव्यवस्था आहेत. पण तो स्वतः व्यक्ती म्हणून एका क्वांटुम-विश्वाच्या अनिश्चिततेत भ्रमण करणारे गहस्यमय अस्तित्व आहे, हे रूपक या कादंबरीचे संकल्पनात्मक मूळ आहे.

लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan

पाने : 291
किंमत : रु. 350
आयएसबीएन क्रमांक : 9788194468332

Category: Tag:

लेखक संपर्क

श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com