आंबेया डहाळी

200.00

माझं हे लेखन म्हणजे माझ्या व्यक्तित्वाचाच आविष्कार आहे . अध्यात्म हा काही माझा प्रांत नाही , तसा माझा पिंड नाही , प्रकृती नाही . पण कारणपरत्वे विद्यापीठात अध्यापन करताना संत साहित्याचं मी वाचन केलं . त्यातलं जे काही मनात उतरलं ते मनोमन मुरलं , लेखनात उतरलं . त्यात मधुररम्यतेच्या खुणा प्रकटल्या , असे म्हटले तर गैर ठरू नये .

लेखक : डॉ. अनंतराव देशमुख / Dr. Anantrao Deshmukh
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations
किंमत : रु. २००/-

Description

मनोगत

सामान्यतः गेली चाळीस वर्षं मी संशोधनात्मक , समीक्षात्मक आणि चरित्रात्मक लेखन करीत आलो . काही प्रसंगपरत्वे आणि विशेषतः सन्मित्रांच्या आग्रहाखातर मी ललित – वैचारिक लेखन केले . श्रीराम शिधये आणि सारंग दर्शने यांच्यामुळे अध्यात्माची थोडीशी झाक असलेली टिपणे ‘ महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘ सगुण – निर्गुण ‘ सदरासाठी लिहिली , ‘ आकाशवाणी’च्या ज्योत्स्ना केतकर यांच्यामुळे निसर्गाची सूक्ष्म चित्रं रंगवली . महेंद्र सुके या पत्रकारमित्रानं माझी ललितगद्यात्मक चित्रं ‘ प्रहार’च्या रविवार आवृत्तीत वेळोवेळी प्रकाशित केली .

माझं हे लेखन म्हणजे माझ्या व्यक्तित्वाचाच आविष्कार आहे . अध्यात्म हा काही माझा प्रांत नाही , तसा माझा पिंड नाही , प्रकृती नाही . पण कारणपरत्वे विद्यापीठात अध्यापन करताना संत साहित्याचं मी वाचन केलं . त्यातलं जे काही मनात उतरलं ते मनोमन मुरलं , लेखनात उतरलं . त्यात मधुररम्यतेच्या खुणा प्रकटल्या , असे म्हटले तर गैर ठरू नये .

मराठी ललित निबंधाचा प्रवाह कुसुमावती देशपांडे , इरावती कर्वे , गो.वि.करंदीकर , प्राणहिता , मधुकर केचे , सुरेश मथुरे , महेश एलकुंचवार यांनी अतिशय समृद्ध आणि संपन्न केला आहे . प्रा . वि . शं . चौघुले यांनी तर ‘ लघुनिबंध ते मुक्तगद्य ‘ या पुस्तकात हा प्रवाह किती विस्तृत पसरला आहे , आशयाच्या आणि आविष्काररूपांच्या नानाविध वाटा त्याने कशा चोखाळल्या आहेत , याचा आलेखच काढला आहे . या प्रकारात माझ्या परीनं मी जी भर घातली ती इथं एकत्र केली आहे .

अभ्यासकांना आणि रसिकांना ती आवडावी अशी अपेक्षा आहे .

सदर पुस्तक प्रकाशित करण्यात ‘ व्यास क्रिएशन्स् ‘ च्या नीलेश गायकवाड आणि श्री . वा . नेर्लेकर यांनी रस दाखवला आणि माझे मित्र लेखक , कलावंत , कवी आणि चित्रकार रामदास खरे , सुधीर मुणगेकर आणि व्यास क्रिएशन्स्च्या अन्य सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच तो नेटक्या स्वरूपात प्रकाशित होत आहे , त्याबद्धल त्यांचे मनःपूर्वक आभार .

– डॉ . अनंत देशमुख

लेखक : डॉ. अनंतराव देशमुख / Dr. Anantrao Deshmukh
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations
किंमत : रु. २००/-

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

व्यास क्रिएशन्स्
डी-१, सामंत ब्लॉक्स, श्री घंटाळी देवी मंदिर पथ, नौपाडा, ठाणे (प.) ४०० ६०२.
दूरध्वनी : २५४४७०३८ / ९९६७८३९५१०
Email : info@vyascreations.comvyascreations@gmail.com
Facebook : www.facebook.com/joinvyascreations