आस्थेचे प्रश्न

260.00

गेल्या काही वर्षात रंगनाथ पठारे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले लेख, केलेली भाषणे व चर्चासत्रांमध्ये सादर केलेले निबंध या ग्रंथात एकत्रित करण्यात आलेले आहेत. पठारे यांच्या आस्थेचा विषय झालेले समकालीन सांस्कृतिक प्रश्न हे सूत्र त्यांना एकत्र करण्यासाठी आहेच, खेरीज ‘सत्त्वाची भाषा’ या त्यांच्या ग्रंथाचा पुढचा भाग अथवा टप्पा म्हणूनही त्याच्याकडे पाहाता येईल.

रंगनाथ पठारे यांच्यासारखा समकालीन महत्त्वाचा निर्मितिशील लेखक या प्रश्नांकडे कोणत्या प्रकारे पाहातो या दृष्टीने या ग्रंथाला महत्त्व आहे आणि त्यांनी उभे केलेले प्रश्न, मांडलेले आकलनही विचारप्रवर्तक म्हणूनच कृतिप्रवण करण्याची विपुल शक्यता असलेले असेच आहे.

लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan

पाने : 208
किंमत : रु. 260

Category: Tag:

लेखक संपर्क

श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com