अक्षरॠतू
₹100.00
कवितेच्या ऐसपैस माळरानावर दूर देवगडच्या सड्यावर प्रमोद जोशी नावाचं टवटवीत फूल काव्य रसिकांना भरभरून सुगंध देत आहे. प्रमोद जोशींची कविता अस्सल असल्यामुळे ती रसिकांपर्यंत थेट पोहोचते. एक विशिष्ट अशी आंतरिक लय, नादमाधुर्य आणि आशयसंपन्न रचना हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य.
आसपासच्या सर्व हालचाली अचूक टिपण्याचे सामर्थ्य प्रमोद जोशींकडे आहे. त्यामुळे विविध विषयावर लिहिताना त्यांना अनेक उत्तमोत्तम प्रतिमा सापडत जातात. आणि त्यातून चमकदार ओळी तयार होतात.
लेखक : प्रमोद जोशी / Pramod Joshi
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 96
किंमत : रु. 100