चैतन्य
₹100.00 ₹75.00
श्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन ह्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले. त्यांचे विविध वैचारिक विषयांवर लेख मराठीसृष्टी.कॉम या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहेत. त्यांचे लेखन अत्यंत वाचकप्रिय आहे हे त्यांच्या लेखनाला मिळणार्या प्रतिसादावरुनच लक्षात येते.
त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या १४ निवडक लेखांचा हा संग्रह.
लेखक : सतिश परांजपे / Satish Paranjpe
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ७५/-
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
Description
या देवी सर्वभूतेषु चैतन्येत्यभिधीयते। नमस्तस्यै। नमस्तस्यै। नमस्तस्यै नमो नम:॥
देवीसूक्तांतील वरील श्रुतीचा भावार्थ हा, की देवी ही ‘चैतन्य’ रूपात सर्व प्राणिमात्रांमध्ये वास करते. खरे आहे, कारण एकदा का चेतना शरीरातून निघून गेली, की उरते अचेत जडत्व. आपण जे काही करतो, त्यासाठी आवश्यक असते, चेतना व सततचे चैतन्य. ह्या पुस्तकात जे विषय हाताळले आहेत, त्या सर्वांसाठी ही ग्राह्य बाब आहे. जागरूकता, सजगता, क्रियाशीलता, उमंग, तात्पर्याने सातत्याचे ‘चैतन्य’, म्हणूनच पुस्तकाला समर्पक शीर्षक दिले आहे, ‘चैतन्य’.
चेतना असताना मात्र माणसाने कसे सातत्याने तत्पर, उत्साही असायला हवे, जसे सिनेसृष्टीत देवानंदला आपण सदाबहार म्हणतो, कधी वय भासू न देणारे, तसे. अर्थात, असे सगळे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते, पण प्रयत्न करणे तर सगळ्यांच्याच हाती असते. त्यासाठी गरज असते सकारात्मक दृष्टिकोनाची. त्यासाठी तसे संस्कार जन्मत: (गर्भसंस्कार) किंवा बालपणापासून व्हावे लागतात किंवा तशी भौतिक व मानसिक घडण आई-वडिलांना प्रयत्नपूर्वक करावी लागते. कारण, सगळ्यांचे आई-वडील एकसारखे नसतात व सगळ्यांची पारिवारिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीपण एकसारखी नसते. सगळ्यांना नशिबाची साथ एकसारखी नसते, तेव्हा सगळ्यांना मिळणाऱ्या संधी एकसारख्या कशा असणार? परंतु, म्हणतात ना, विविधतेतच तर मजा असते, जीवनाचा रस असतो, अन्यथा जीवन रटाळ झाले असते.
जीवनात येणारे चढ-उतार सुख-दुःखांना समभावाने कसे सामोरे जायचे व असेच वेगवेगळ्या पैलूंवर कसाकसा दृष्टिकोन असावा, ह्याबाबत –
“चैतन्य, स्व:ओळख, झेप, स्वावलंबनाची मैत्री, परिधान बरेच काही बोलते, शब्दांचे गणित, इच्छाशक्ती, बदलती मानसिकता, काळ-काम-वेग, टेन्शन घ्या टेन्शन, आनंदाची लवचीकता, उपासना, अभिलाषा, मृत्युंजय” अशा विविध मथळ्यांवर ह्या पुस्तकात ऊहापोह केला आहे.
एक महत्त्वाचे म्हणजे, ह्या सगळ्या लेखांमधील माझे विचार व्यक्तिगत स्वानुभवावर आधारित असून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, असा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
लेखक : सतिश परांजपे / Satish Paranjpe प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १००/- सवलत किंमत : रु. ७५/-
Chaitanya | Satish Paranjape | Marathisrushti
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीचाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com