Sale!

एकलव्या

100.00 50.00

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

झोपडपट्टीत जन्मलेल्या पण गुणी मुलीची सामान्य आयुष्य जगण्यासाठी चाललेली धडपड म्हणजेच *”एकलव्या”*.

हलाखीच्या जीवनातून बाहेर निघून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माणच नव्हे तर सिद्ध करून दाखविणारी मुलगी मिनी..

मिनीची प्रसंगी दामिनी होऊन ठाकणारी, नशिबाला दोष देत रडत न बसता परिस्थितीशी झगडून तीवर मात करून यशस्वी होऊन अंती सौदामिनीगत चमकून आपलं नाव आणि असामान्यत्व सिद्ध करून दाखविणाऱ्या अनेक विरांगनांपैकी एक अशी ही “एकलव्या” .

वाचकांची उत्कंठा वाढवेल, त्यांना खिळवून ठेवेल, अंती आपलीशी वाटेल अशी कादंबरी.

लेखिका : सौ वासंती वैद्य
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ५०/-

हे पुस्तक खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी खालील पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आत्ताच खरेदी करा !

SKU: ekalavya-by-vasanti-vaidya Category:

Description

लेखिका : सौ वासंती वैद्य
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ५०/-

आठ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिवशी महिला सबलीकरणाच्या कार्यक्रमात सहभागासाठी निघाले होते. दुपारी वाजताची वेळ, स्थळ नागपूर, म्हणजेच वऱ्हाडातील रणरणतं उन्ह, तापलेले रस्ते. कालची रामनवमीला रस्ताभर काढलेली रांगोळी आज जराशी मलूल, विस्कटलेली दिसत होती.

मी सिग्नलला थांबलेले. छे बाबा, निदान उन्हाळ्यात दुपारी तरी सगळे सिग्नल हिरवे लागायला हवेत, सनकोट, हॅन्डग्लोव्हज, गॉगल्स सगळा जामानिमा असूनही हातपाय भाजताहेत मनात विचार येतात तोच अचानक विचारचक्र थांबतं..

मला दिसतं येवढ्या उन्हाची, झळांचीपर्वा न करता एक छोटीशी मुलगी रस्त्यावरील रांगोळी गोळा करून त्याच रांगोळीने बाजुला सुरेख चित्र रेखाटत होती. मागून येणाऱ्या वाहनांच्या कर्णकर्कश्य आवाजाशी, डोक्यावरील रखरखत्या उन्हाशी जणू तिचा काही संबंधच नव्हता, शरीर भाजणाऱ्या लाटा तिला जणू विंझणवाराच घालत होत्या. कारण इतक्या भर उन्हाची ती फुटपाथवर फतकल मांडून बसली होती रस्त्यावरील विस्कटलेल्या रांगोळीचा झाडून बाजुला ढीग केलेला होता आणि त्याच ढीगातून रांगोळी घेऊन ती एकाग्रतेने आपली स्वतंत्र रांगोळी रेखाटत होती. सगळे रंग एकत्र होऊन त्या रांगोळीचा रंग काळपट झाला होता, त्यानेच ती अप्रतिम चित्र रेखाटत होती, नक्कीच ती उत्तम चित्रकार होती.

माझा सिग्नल झाल्याने मी निघाले. कार्यक्रम संपला तो दिवस गेला पण ती मुलगी मनातून जाईना. मनातल्या तिने हळूहळू मनाचा ताबा घेतला आणि या लघु कादंबरीचे रूप धारण केले. या मुलीची जीवनकहाणी म्हणजेच “एकलव्या” कादंबरी.

लेखिका वासंती वैद्य, 
पुणे.

Ekalavyaa
Vasaanti Vaidya
Marathisrushti

लेखक संपर्क

सौ. वासंती वैद्य

पूर्वाश्रमीचे नाव : सौ. वासंती मुकुन्द शहाणे
स्टेट बँक ऑफ इंडिया नागपूर येथे कार्यरत

शिक्षण : बी.कॉम, बी.ए. (ज्योतिषशास्त्र)

आवड : ‘ती चांदणफुले’ या नावाने एक कवितासंग्रह प्रसिद्ध. काव्य, विनोदी लेख, कथा, कविता, नाटके व ललित लेखन प्रसिद्ध, नाटक लिहिणे, बसविणे, नाटकात-काम करण्याची, सामाजिक कार्याची आवड, सूत्रसंचालन, निवेदनाचे कार्यक्रम लोकमत कविता वाचन स्पर्धा, आंतरबँक हिंदी मराठी काव्य प्रतियोगितांमध्ये पुरस्कार प्राप्त. आकाशवाणीवर नियमीत काव्यवाचनाचे कार्यक्रम

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा