फिर्याद

100.00

आज दलित कविता क्रांतिकारक वळणावर आहे. पण त्यातील पुरुष कवींनी जादा जागा व्यापलेली आहे. तो आज मोठ्या संख्येने बोलू लागला आहे. पण दलित स्त्री वाङ्मयाच्या क्षेत्रात मुकीच आहे. अपवाद म्हणून दोन-तीन कवयित्री बोलू लागल्यात, त्यात हिरा बनसोडे ह्या विजेची वेल होऊन तळपत आहेत.

स्त्रियांच्या दुःख वेदनेला, त्यांच्या काळीज गोठवणाऱ्या आकांताला नवी विद्रोहाची धार कवितेच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होते. त्यांची ही फिर्याद सांदी- कोपऱ्यातली नाही, तर ती पुरुष प्रधान संस्कृतीच्या व्यासपीठावरची आहे.

लेखक : हिरा बनसोडे / Hira Bansode
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 76
किंमत : रु. 100