कोलाज
₹100.00 ₹80.00
प्रत्येकाच्या वाट्याला असंख्य बरे,वाईट, हसवणारे, रडवणारे, सुखदुःखाचे अनुभव येत असतात. असे अनुभव माझ्या ‘कोलाज’चे विषय आहेत.
माणसांना वाचणे मला आवडते. माणसे विविध प्रकारे व्यक्त होतात. ते जसे मला उलगडतात तसे मी लिहित जाते. म्हणून यातील लेखांमध्ये कोणताही एक विशिष्ट लेखनप्रकार नाही किंवा निश्चित केलेला असा विषय नाही. म्हणून तर याचे नाव कोलाज असे ठेवले आहे. विविध माध्यमांना एकत्र करून कोलाजची निर्मिती होते. त्या विविधतेतून एकसंघ अशी कलाकृती निर्माण होते. तसेच या लेखांचे विषयही वेगवेगळे असले तरी मानवी स्वभाव, प्रेरणा,वर्तनाचा शोध घेणे व त्यातून उलगडणारे विविध पैलू शब्दरुपात प्रकट करणे हा मूळ उद्देश आहे.
एका अर्थाने हे माझेच स्वगत आहे. इतरांच्या अनुभवासह स्वतःचेही अनुभव यात आहेत.
लेखक : प्रा. आराधना कुलकर्णी
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. 100/-
सवलत किंमत : रु. 80/-
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
Description
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
प्रत्येकाच्या वाट्याला असंख्य बरे,वाईट, हसवणारे, रडवणारे, सुखदुःखाचे अनुभव येत असतात. असे अनुभव माझ्या ‘कोलाज’चे विषय आहेत.
माणसांना वाचणे मला आवडते. माणसे विविध प्रकारे व्यक्त होतात. ते जसे मला उलगडतात तसे मी लिहित जाते. म्हणून यातील लेखांमध्ये कोणताही एक विशिष्ट लेखनप्रकार नाही किंवा निश्चित केलेला असा विषय नाही. म्हणून तर याचे नाव कोलाज असे ठेवले आहे. विविध माध्यमांना एकत्र करून कोलाजची निर्मिती होते. त्या विविधतेतून एकसंघ अशी कलाकृती निर्माण होते. तसेच या लेखांचे विषयही वेगवेगळे असले तरी मानवी स्वभाव, प्रेरणा,वर्तनाचा शोध घेणे व त्यातून उलगडणारे विविध पैलू शब्दरुपात प्रकट करणे हा मूळ उद्देश आहे.
एका अर्थाने हे माझेच स्वगत आहे. इतरांच्या अनुभवासह स्वतःचेही अनुभव यात आहेत.
प्रत्येक गोष्ट, प्रसंग, वेगळ्या जाणवलेल्या अनुभवाकडे सूक्ष्म नजरेने बघितले की एखादी घटना, एखादे वाक्य मनात रेंगाळत राहते मग त्यातून लेखन स्फुरते.
आपल्या आयुष्यात अनेक अभाव असतात. विविध प्रकारची संकटे येतच असतात. दुःखे तर खूपच आहेत पण आयुष्य एकच आहे. अशा स्थितीत प्रेरणा देणारी अनेक माणसे शोधणे आवश्यक आहे. जी असतातच, फक्त आपल्यात शोधक वृत्तीचा अभाव असतो. ती दृष्टी ठेवली तर दुःखद, प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक राहणारी, निर्भयपणे सामाजिक कार्ये करणारी अनेक माणसे आपल्याला दिसतात. त्यातील सकारात्मकता टिपण्याचा प्रयत्न मी लेखनातून करत असते.
लेखक : प्रा. आराधना कुलकर्णी
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीदूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com