कुणब्याची कविता

130.00

कवी लक्ष्मण महाडिक यांची कविता मी पाच-दहा वर्षांपासून वाचतो आहे. त्यांच्या तोंडून ऐकतो आहे… खेड्यातलं कुणब्यांचं जगणं किताही सावरलं, नीट शेतीवाडी, संसार केला तरी आयुष्यात झालेली फरफट, कमालीचं दुःख त्याला फोडूनच टाकतं…

त्याच्या खेड्यांच्या मुक्त विद्यापीठाचा कुलगुरू आजही शेतकरी महाकवी तुकारामच आहे. जीवन जगण्याचा कुणब्यासाठीचा सगळा जगण्यातला कळवळा अगदी साध्यासाध्या शब्दांनी तुकोबांनी दिला. खेडं, शेती तिथलं दुःख, आनंद व समाजातल्या नात्यागोत्यांची गुंतवळ आख्खी तुकोबांनी दिली. तिचंच प्रतिरूप आजच्या काळात वेगळ्या अनुभवांनी नव्या संदर्भात लक्ष्मण महाडिकांसारखे कवी कवितेतून उभं करताहेत.

लेखक : लक्ष्मण महाडिक / Lakshman Mahadik
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 80
किंमत : रु. 130