
महात्मा ज्योतिबा फुले : चरित्र आणि कार्य
₹30.00
महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ मध्ये झाला. ज्योतिबांचे मूळ गाव कटगुण होते. ज्योतिबांचे आजोबा शेटीबा गोरे तेथे रहात. त्यांच्याकडील जमीन सावकाराने घेतल्याने शेटीबा खानवाडी या पुरंदर तालुक्यातील गावी राहण्यासाठी आले. तेथूनही पुढे ते पुण्यात आले. पुण्यात येऊन ते फुलमाळ्याचा व्यवसाय करू लागले. त्यामुळे त्यांचे गोरे हे नाव मागे पडून लोक त्यांना फुले म्हणू लागले आणि पुढे फुले हेच आडनाव रूढ झाले.
शेटीबा यांना ३ मुले होती. त्यांची नावे राणोजी, गोविंदा आणि कृष्णा. पैकी गोविंदराव यांनी पुण्यात फुले आणि भाजीपाला विक्रीचे दुकान सुरू केले. या व्यवसायावरच त्यांचे कुटुंब अवलंबून होते.
लेखक : सुमती पाटील / Sumati Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30