पर्याय शब्दकोश

630.00

एखादा लेख लिहिताना किंवा पत्र लिहितानाही समर्पक शब्द शोधण्यासाठी नुसता त्या त्या शब्दांचे अर्थ सांगणारा किंवा समानार्थी शब्द सांगणारा कोश उपयोगी पडत नाही. तर त्याच अर्थच्छटेचे विविध पर्याय वाक्प्रचार व म्हणींसह सांगणाऱ्या कोशाची आवश्यकता असते. ती आवश्यकता ओळखून वि. शं. ठकार यांनी ‘पर्याय शब्दकोश’ सिद्ध केला आहे.

लेखक : वि. शं. ठकार | V S Thakar
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस | Mehta Publishing House

पाने : ९७६
किंमत : रु. ६३०/-
आयएसबीएन क्रमांक : 9788177663051
आवृत्ती : ५ वी  (२०१८)

Description

एक मूळ शब्द, त्यासमोर त्याचे समानार्थी, तसेच, जवळच्या अर्थच्छटांचे शब्द व शब्दसमूह, आणि शक्य तेथे वाक्प्रचार व म्हणी, अशी या कोशाची सर्वसाधारण मांडणी आहे. कोशाची रचना वर्णानुक्रमे आहे; त्यामुळे पर्याय शब्द शोधणे सुकर होईल. या पुस्तकाच्या शीर्षक पृष्ठांमध्ये पर्याय शब्द कसा शोधावा याचंही मार्गदर्शन केलं आहे.

इंग्रजीतून लिखाण करू इच्छिणाऱ्या मराठी भाषकांना, तसेच मराठीशी बेताचाच परिचय असणाऱ्या अथवा नव्याने मराठी शिकणाऱ्या, परंतु इंग्रजी जाणणाऱ्या, अभ्यासूंना उपयुक्त होण्याच्या दृष्टीने या कोशात मराठी शब्दांचे इंग्रजी पर्याय शब्दही दिले आहेत.

मराठीचा इंग्रजीत अनुवाद करू इच्छिणाऱ्यांनाही हे शब्द साह्यकर होतील. तर लेखकांसाठी, अनुवादकांसाठी, संपादकांसाठी, मुद्रितशोधकांसाठी,  कोडं तयार करणाऱ्यांसाठी, कोडं सोडवणाऱ्यांसाठी हा शब्दकोश उपयुक्त आणि संग्राह्य आहे.

लेखक : वि. शं. ठकार | V S Thakar
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस | Mehta Publishing House

पाने : ९७६
किंमत : रु. ६३०/-
आयएसबीएन क्रमांक : 9788177663051
आवृत्ती : ५ वी  (२०१८)

Paryay Shabdakosh
Mehta Publishing House
V S Thakar

Modern Marathi-Marathi-English Thesaurus

प्रकाशक संपर्क

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पर्याय शब्दकोश”

Your email address will not be published. Required fields are marked *