स्वर्गभूमी
₹100.00 ₹50.00
हिमालयाचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम नि अतुलनीय आहे. ह्या रमणीय पर्वतीय प्रदेशात भटकताना निसर्गाचे हे दैवी अपरुप, असामान्य सौंदर्य पाहून पाय आपोआप स्थिरावतात आणि मग वाटते की निसर्गदेवतेने तिच्या मुलांना खेळण्या-बागडण्यासाठीच ही भूमी निर्माण केली आहे. तिथे विहरताना जीवनाच्या हेतूची ओळख आपल्या मुलांना व्हावी, असेच तिला वाटत असेल. तिथे डोलणाऱ्या लहानशा तृणपात्यापासून ते आकाशाचा वेध घेणाऱ्या हिमाच्छादित पर्वत शिखरापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगत असते की जीवनात दुःख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही; आहे तो फक्त आनंद! खरंच, हिमालयातील भटकंतीत मिळणारा आनंद हा अवर्णनीय आहे. अशा ह्या निसर्गसंपन्न देवभूमी, स्वर्गभूमी हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड व हिमाचल प्रदेश राज्यातील काही आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण ज्ञात/अज्ञात स्थानांचा परिचय करुन देण्याचा प्रयत्न मी ह्या पुस्तकात केला आहे. पर्यटकांना, निसर्गप्रेमींना हे पुस्तक आवडेल, उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे.
स्मार्ट डिजिटल पुस्तक
लेखक : प्रकाश लेले
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.