ते आभाळ भीष्माचं होतं

1,000.00

पितामह भीष्माचार्यांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा इतका विस्तृत, मूलगामी आणि मर्मग्राही धांडोळा मराठी वाङ्मयात प्रथमच यथासांग चित्रित करण्याचे महत्कार्य ‘ते आभाळ भीष्माचं होतं…!’ या महा-कादंबरीच्या मिषाने अशोक समेळ यांनी व्रतस्थपणे केले आहे.

लेखक : अशोक समेळ
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन

पाने : ८०२

किंमत : रु. १०००/-
सवलत किंमत : रु. १०००/- पोस्टेजसहित

मराठीसृष्टी टॉक्स वर या पुस्तकाविषयी लेखक श्री अशोक समेळ यांची मुलाखत बघा खाली असलेल्या पुस्तकाचा पॉडकास्ट या TAB मध्ये…

छापील पुस्तक खरेदीसाठी खालील Add To Cart बटणवर क्लिक करा. 

SKU: operation-sindoor-by-brig-hemant-mahajan-1 Category: Tags: ,

Description

“मी अश्वत्थामा… चिरंजीव…!” या रसिकाग्रणी गाजलेल्या महा-कादंबरी नंतर अल्पावधीतच ‘ते आभाळ भीष्माचं होतं…!’ ही पितामह भीष्माचार्य यांच्या कर्मसिद्धीवर एक नितांत सुंदर अभिलिखित महा-कादंबरी मराठी रसिक वाचकांच्या ‘अमृताचिए ताटी’ आस्वादासाठी माझे परम मित्र नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, कादंबरीकार अशोक समेळ यांनी ‘ओगरली’ आहे.

पितामह भीष्माचार्यांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा इतका विस्तृत, मूलगामी आणि मर्मग्राही धांडोळा मराठी वाङ्मयात प्रथमच यथासांग चित्रित करण्याचे महत्कार्य ‘ते आभाळ भीष्माचं होतं…!’ या महा-कादंबरीच्या मिषाने अशोक समेळ यांनी व्रतस्थपणे केले आहे.

भीष्म हे स्वतः एक तारांकित असे आभाळ होते…! ताऱ्यांनी खच्चून भरलेले निगम अंतराळ होते… ! नि त्या अंतस्थ अंतराळात ध्रुव ताऱ्यासारखा अढळ कर्मयोगी, निःसंग पुरुषार्थी व निरामय आर्ती असलेला पितामह भीष्माचार्यांचा कधीही निस्तेज न होणारा तेजःपुंज दीपस्तंभ आहे…!

महाभारताच्या परिघाचा हा घनमध्य मानबिंदू म्हणजे ताण-तणावांनी भारलेला ‘देवव्रत’; महापराक्रमी, दार्शनिक तत्त्वज्ञानी, महारथी कोदंडधारी परशुराम शिष्य… पितामह भीष्माचार्य…! की ज्यांच्या नावावरून ‘भीष्म-प्रतिज्ञा’ ही शब्दसिद्धी चिरकालासाठी अखिल संस्कृतीत दृढमूल झाली आहे. भारतीय संस्कृतीचा झगमगता इतिहास भीष्माचार्यांना टाळून पुढे जाऊच शकत नाही, हे केवळ एकमेवद्वितीय सत्य आहे…!! या सर्व महाकालपटाचा वेध आणि निर्वेध घेताना श्री. अशोक समेळ यांनी आपली तपश्चर्या फळाला लावली यात शंकाच नाही…! व्यामिश्र कथेतून भीष्माचार्यांचा दीपस्तंभ उजळत ठेवताना त्यांनी जे भाषिक पालाण घातले आहे त्याला तोड नाही.

अशोक समेळ यांनी नाट्यात्मक संवाद, कथानकाचा कालपट, सघनसार्थ भाषा व भीष्माचे तरलतम अंतरंग या चार दिग्गजांवर पेललेले हे भीष्मांचे आभाळ आहे…! शेवटी रंगातून अंतरंगाकडे जाणे हे नाटक आणि अंतरंगाचे आत्मिक विविध रंगदर्शन करते ती महा-कादंबरी…! ‘ते आभाळ भीष्माचं होतं…!’ या महा-कादंबरीचे रसिकांच्या मनोपंजरी स्थित असण्याचे चिरंजीवित्व हेच भागधेय आहे…!!

या दृष्टीने अशोक समेळ यांची ही महा-कादंबरी अभिजात वाङ्मयात धृवस्थित होईल अशी मला मनोमन खात्री आहे…!

– प्रा. अशोक बागवे

लेखक : अशोक समेळ
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन

 

पुस्तकाचा पॉडकास्ट

मराठीसृष्टी टॉक्स या YouTube Channel वर या पुस्तकाविषयी लेखक श्री अशोक समेळ यांची मुलाखत बघा या पॉडकास्टमध्ये…

लवकरच येत आहे !