वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर

200.00

पती तुकाराम खेडकरांच्या अचानक जाण्यानं आकाशच कोसळलं… घरचा धनी… फडाचा मालक असा अचानक गेला… पैशांची तरतूद नव्हती… चरितार्थाचाही प्रश्न होता… फडही विस्कळीत झाला…पण कांताबाई स्वस्थ बसणाऱ्यातल्या नव्हत्या… त्यांनी मराठी केली… ‘पुन्हा जुळवाजुळव पुन्हा फड उभा राहिला… मुलुखातल्या तमाम जनतेच्या मनोरंजनासाठी ढोलकीच्या तालावर कांताबाईंचे घुंगरू पुन्हा नाचू लागले. भिंगरीसारख्या नाचणाऱ्या कांताबाईंच्या तमाशाचे तंबू हजारोंच्या उपस्थितीने गावोगावी ओसंडत वाहू लागले… खेड्यापाड्यांत वर्षाकाठी दोनशे-सव्वादोनशे दिवस फडातील दोनशे कामकरी, कलाकारांसह आपल्या परंपरागत कलेने मराठी मनाला रिझविण्यासाठी फिरणाऱ्या कांताबाई आज पंच्याहत्तरीनंतरही आपल्याच मस्तीत दंग आहेत…

लेखक : संतोष खेडलेकर / Santosh Khedlekar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 144
किंमत : रु. 200