वेगळी माती, वेगळा वास

260.00

मी आजपर्यंत प्रवासाशी संबंधित असे जे ललित लेखन केले, ते सगळे इथे एकत्र जुळवले आहे. इतर ललित लेखांबरोबर सुटे-सुटे, इथे-तिथे असे माझे प्रवासविषयक लेख आतापर्यंत प्रसिद्ध झाले. ज्या चार ललितलेखसंग्रहांत हे लेख विखुरलेले होते, त्यांपैकी एका पुस्तकाचा अपवाद वगळता, इतर तीन लेखसंग्रह आता उपलब्धही नाहीत; म्हणून प्रवासाच्या एकाच सूत्रात गुंफलेले या पुस्तकातले लेख रसिकांसमोर नव्याने एकत्र सादर केले आहेत. त्यांचा स्पर्श आणि वास रसिकांना वेगळा वाटला, तर या पुस्तकाचे सार्थक आहे.

लेखक : डॉ. अरुणा ढेरे | Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन | Padmagandha Prakashan

पाने : १९२
किंमत : रु. २६०/-

Description

प्रवासाची आवड माणसाच्या रक्तातच असते का? की ती नंतर हळुहळू निर्माण होत जाते? सवयीच्या झालेल्या गोष्टींपासून ते दूर पळणं असतं की स्वत:मधलं चैतन्य टिकवणार्‍या रसदीची कोठारं शोधणं असतं? मग तो प्रवास भौगोलिक असो, की काळात किंवा इतिहास-परंपरेत केलेला प्रवास असो; पुष्कळदा वर्तमानातल्या भौगोलिक प्रवासात हे इतर प्रवास गुंतलेलेच असतात. कारण आपली भूमी आजच्या माणसांबरोबरच प्राचीन माणसांचं जगणंही जपते आहे. त्यामुळेच प्रवास करताना आपलं देशाचं आणि काळाचं भान तर वाढतंच पण माणसाविषयी जाणून घेण्याचं आपलं कुतूहलही न शमता वाढतच राहतं. आणि वाढण्याचा अनुभव नेहमीच आपल्याला नैसर्गिकपणे हवासा असतो.  म्हणून मग प्रवासही हवाच असतो.

मी आजपर्यंत प्रवासाशी संबंधित असे जे ललित लेखन केले, ते सगळे इथे एकत्र जुळवले आहे. इतर ललित लेखांबरोबर सुटे-सुटे, इथे-तिथे असे माझे प्रवासविषयक लेख आतापर्यंत प्रसिद्ध झाले. ज्या चार ललितलेखसंग्रहांत हे लेख विखुरलेले होते, त्यांपैकी एका पुस्तकाचा अपवाद वगळता, इतर तीन लेखसंग्रह आता उपलब्धही नाहीत; म्हणून प्रवासाच्या एकाच सूत्रात गुंफलेले या पुस्तकातले लेख रसिकांसमोर नव्याने एकत्र सादर केले आहेत. त्यांचा स्पर्श आणि वास रसिकांना वेगळा वाटला, तर या पुस्तकाचे सार्थक आहे.

पाने : १९२
किंमत : रु. २६०/-
आवृत्ती : २०१८

लेखक संपर्क

`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९
फोन : (०२०) २४२२९२८०

प्रकाशक संपर्क

पद्मगंधा प्रकाशन

१०३, धन्वंतरी टेरेस, कर्नाटक हायस्कूलजवळ, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे ४११०३८

Dhanwantari Terrace, Flat no 103, Near Karnataka High School, Pandurang Colony, Erandwana, Pune 411038

Telephone : 7350839176,020-25442455/24450260