
विलग
₹90.00
नव्वदच्या दशकात शहरी व ग्रामीण जीवनाच्या सर्वच स्तरांवर होऊ लागलेल्या पडझडीला कवितेतून समर्थपणे प्रतिक्रिया देऊ पाहणाऱ्या नव्या पिढीमध्ये तीव्र समाजभान असलेल्या कवींची संख्या लक्षणीय आहे. सर्वसामान्यांच्या जगण्यातले छोटेमोठे दैनंदिन ताणतणाव, संघर्ष, नैतिक व मूल्यात्मक अध:पतन इ. कवितेच्या भाषेत मांडण्याची संवेदनशीलता मराठी कवितेत प्रथमच इतक्या थेटपणे व सामुहिक आवाजात ही पिढी दाखवते आहे.
गणेश वसईकर यांची ‘विलग’ मधील कविता वाचतांना नेमका हाच अनुभव आपल्याला येतो.
लेखक : गणेश वसईकर / Ganesh Vasaikar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 84
किंमत : रु. 90