विसविशीत जगण्याच्या उंबरठयावरून …

200.00

कविता लिहिणं कुठल्याच अर्थानं लाभदायक नसताना समुहाच्या उरल्यासुरल्या स्वप्नांना फुलवण्याचा घेतलेला वसा पूर्ण करण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे.

नागफण्यातून विष धावून यावं तसं धावून येणारं वर्तमान झेलताना होणारी कासाविशी कमी करण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे.

अंगण परिसरात कोणती झाडं-वेली जगवावीत याची जागती जाणीव सातबाराच्या मालकांना देण्यासाठी लिहिली गेलेली ही कविता आहे.

लेखक : विलास माळी / Vilas Mali
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 128
किंमत : रु. 200