विवेक आणि विद्रोह

170.00

विद्रोहाची शक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणातच वापरली गेली पाहिजे याचे भान राखणारा आणि विध्वंसाबरोबरच विधायक नवनिर्माणाचा आग्रह धरणारा विवेकी परिवर्तनवादी कोणत्याही काळात दुर्मिळच असतो. तो नेहमी हे जाणून असतो की श्रद्धा डोळस हवी, त्याग सबळ हवा आणि तत्त्वे पोषक हवीत. त्याला हे माहीत असते की परिवर्तनासाठी उभारलेल्या संस्था किंवा चळवळी महत्त्वाच्या, हे खरे; पण प्रसंगी त्यांनाही मागे ठेवून, ज्याच्यासाठी परिवर्तनाचे प्रयत्न आहेत, तो माणूस अधिक महत्त्वाचा मानला जायला हवा.

लेखक : डॉ. अरुणा ढेरे / Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन / Padmagandha Prakashan

पाने : 248
किंमत : रु. १७०/-

Category: Tag:

लेखक संपर्क

`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९
फोन : (०२०) २४२२९२८०