यशवंत
₹150.00 ₹75.00
स्मार्ट डिजिटल पुस्तक
मुंबई पोलिसांचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त श्री. व्यंकट पाटील यांची ही कादंबरी.
यशवंत नावाच्या एका शिक्षकी पेशाच्या माणसाला मध्यवर्ती ठेवून त्याच्या आयुष्यावर कादंबरीचा विषय फिरता ठेवतांना, एक पोलीस अधिकारीही आपले प्रेम कसे फुलत गेले त्याचा उलगडा करतानाचा प्रत्यय आपल्याला कादंबरी वाचताना नक्कीच येईल .
पोलीस खात्यात व नेहमी रुक्ष वातावरणात, २४ बाय ७ दिवस काम करताना, एक पोलीस अधिकारी आपल्या लेखणीतून रहस्यमय, गुढ विषय हाताळतांना, प्रेमातील विरह व निसर्ग वर्णन करताना, तुम्हाला त्या त्या शहरी व ग्रामीण वातावरणात अलगद कसा घेवून जातो ते पहाण्यासाठी ही कादंबरी नक्कीच वाचा.
लेखक : व्यंकट पाटील – सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १५०/-
सवलत किंमत : रु. ७५/-
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
Description
या कादंबरीचा जन्म तसा एका प्रेमकथेतून झाला असून समाजात जातीपातीच्या भिंती उभे केल्याने गुन्हे कसे होतात, तसेच पोलीस खात्यातील कामकाजाची पध्दत, प्रेम-विरह, कौटुंबिक वाद, ह्यामधून एक रहस्यमय व गुढ दाखवण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.
साधारण तीस वर्षांपूर्वी घडलेली ही प्रेमकथा आहे. शालेय जिवनापासून सुदामा व द्रौपदी ह्या दोघांमध्ये निखळ प्रेम आहे. पण ते प्रेम करताना समाज व कुटुंबातील लोकांनी त्या दोघात निर्माण केलेला दुरावा तर त्या दोघांना हे अपराधी कृत्य करायला भाग पाडत नाहीत ना?
यशवंत नावाच्या एका शिक्षकी पेशाच्या माणसाला मध्यवर्ती ठेवून त्याच्या आयुष्यावर कादंबरीचा विषय फिरता ठेवतांना, एक पोलीस अधिकारीही आपले प्रेम कसे फुलत गेले त्याचा उलगडा करतानाचा प्रत्यय आपल्याला कादंबरी वाचताना नक्कीच येईल .
पोलीस खात्यात व नेहमी रुक्ष वातावरणात, २४ बाय ७ दिवस काम करताना, एक पोलीस अधिकारी आपल्या लेखणीतून रहस्यमय, गुढ विषय हाताळतांना, प्रेमातील विरह व निसर्ग वर्णन करताना, तुम्हाला त्या त्या शहरी व ग्रामीण वातावरणात अलगद कसा घेवून जातो ते पहाण्यासाठी ही कादंबरी नक्कीच वाचा.
यशवंत ही कादंबरी तर वाचाच.. पण व्यंकट पाटील यांची मराठीसृष्टीने प्रकाशित केलेली *घर हरवलेला पोलिस, वारसा आणि घात* ही इ-पुस्तके सुद्धा जरुर वाचा.
प्रत्यक्ष कोणताही अनुभव न घेता आपण कधी कधी पोलीसांवर टिका-टिपणी करतो. पोलीस कोणत्या परिस्थितीत आपले कर्तव्य पाडतात याचा ही पुस्तके वाचताना आपल्याला पदोपदी अनुभव येईल. मग नक्कीच पोलीसांमध्ये त्यांच्या वरदीच्या आत, डाव्या बाजूला एक हृदय नावाचा अवयव आणि तोही भावनिक असतो याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही .
लेखक : व्यंकट पाटील – सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १५०/- सवलत किंमत : रु. ७५/-
Yashwant
Vyankat Patil
Marathisrushti