श्री राजा शिवछत्रपती

सामान्य माणूस स्व कर्तुत्वाने छत्रपती(राजा) होऊ शकतो हे स्वतःच्या उदाहरणाने दाखवून देणारे जागतिक पातळीवर सर्वोच्च प्रेरक व्यक्तिमत्त्व होय!

छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले.त्याचे सुरज्यात रूपांतर केले.स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला.छत्र  धारण करून छ्त्रपती झाले.या राज्याभिषेकामुळे तळागाळातील जनसामान्य माणसाला प्रेरणा मिळाली.गुलामीच्या मानसिकतेला स्वाभिमानाची ओळख झाली.स्वतःचे राज्य! स्वराज्य!! आपला राजा! आपले राज्य! हा भाव देशभर निर्माण झाला.रयतेला स्वतःचा राजा मिळाला.छत्र धारण करून छत्रपती झालेल्या राजाने स्वाभिमानाचे अग्निकुंड पेटवले!

यातून अनेकांनी प्रेरणा घेऊन स्वतंत्र राज्य निर्माण केले.गुलामगिरी ला झिडकारून लावले.

छ्त्रपती शिवाजी महाराज हे उभ्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत! तेव्हा महाराजांची जेवढी चरित्रे प्रकाशित होतील तेवढी हवीच आहेत. परंतु दर्दैवाने अद्यापही मराठी भाषेतील शिवचरित्राची संख्या फारच थोडी आहे.

हे एक परिपूर्ण शिवचरित्र आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. शिवचरित्र पूर्ण होऊच शकत नाही…इतके ते व्यापक आणि अगाध आहे. पण हे चरित्र परिपूर्णता या शब्दाच्या जवळ आहे.

तरीही अनेक वर्षे केवळ शिवचरित्राचा अभ्यास करून!खडतर प्रवास करून! लाखावर कागद पत्रांचा अभ्यास करून निर्माण केलेले हे एक आलीकडील काळातील व्यापक शिवचरित्र आहे.

इतिहासाला केवळ  श्रद्धाभाव चालत नाही.संशोधक नजर आणि स्वभाव असावा लागतो.गाजाजन भास्कर मेहेंदळे आज हयात असलेली एक श्रेष्ठ संशोधक वल्ली आहे.इतिहासकार आहेत.

शिवाय, खऱ्या इतिहास – संशोधकाला साजेश्या तटस्थ वृत्तीने लिहिलेले हे एक नमुनेदार शिवचरित्र होय. लेखकाने तथाकथित ‘संशोधनात्मक स्वातंत्र्य’ न घेतल्यामुळे या शिवचरित्राला कपोलकल्पित कादंबरीचे स्वरूप न येत, हा एक विश्वसनीय ग्रंथराज झालेला आहे.

हे एका इतिहास – संशोधकाने लिहिलेले साधार शिवचरित्र असले तरी ते केवळ संशोधकांसाठी लिहिलेले आहे असे मात्र नाही. कोणाहि सामान्य वाचकाला सहज समजू शकेल अशा भाषेत ते लिहिलेले आहे आणि म्हणूनच अनेक वृत्तपत्रांनी त्याचे भरपूर कौतुकही केले आहे.

पुस्तकाच्या प्रत्येक पानावर संदर्भ!

ग्रंथ:श्री राजा शिवछत्रपती
लेखक: गजानन भास्कर मेहेंदळे
प्रकाशन:डायमंड पब्लिकेशन्स
पृष्ठ संख्या:२४३२ मोठा आकार(ग्रंथ आकार)
वजन:३६९० ग्रॅम
मूल्य:३५००₹