Sale!

पिंपरी चिंचवड – गाव ते महानगर

100.00 75.00

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

ऐतिहासिक संदर्भ आणि मूल्य असलेल्या व झपाट्यानं बदलू लागलेल्या गावांचा, शहरांचा, नगरांचा परिपूर्ण इतिहास हा ज्यांच्यासमोर हे बदल झाले त्या वयस्कर मंडळींना तसेच तरुण मंडळींना त्या गावाविषयी, शहराविषयी आत्मीयता वाटायला लावतात. जुन्यातलं ‘चांगलं’ कसं कालौघात नष्ट झालं याची हळहळ आणि नव्यातल्या ‘आधुनिकतेनं ‘ गावाचं सौंदर्य कसं वाढवलं याबद्दल कुतूहल अशी संमिश्र भावनाच त्या आत्मीयतेत परिवर्तित होते.

पिंपरी-चिंचवड हे झपाट्याने विकसित झालेले शहर. औद्यौगीकरणामुळे या भागातील खेड्यांचे महानगरात रूपांतर झाले. या महानगराला आध्यात्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. इथल्या मूळ गावांना इतिहास आहे, संस्कृती आहे. भोसरी गावाला इ.स. पूर्वकाळापासूनचा इतिहास आहे. चिंचवडला मोरया गोसावींच्यामुळे आध्यात्मिक, धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. दापोडीत गव्हर्नर बंगला होता. पिंपरीत जोगमहाराजांचे वास्तव्य होते. अशा इथल्या प्रत्येक गावाला त्याचा इतिहास व संस्कृती आहे. याच खेड्यांचे अवघ्या २५-३० वर्षांत समृद्ध, संपन्न महानगरात रूपांतर झाले. या शहराची जडणघडण, इथले लोकजीवन नव्याने शहरात आलेल्या लोकांना कळावे, आपण ज्या शहरात राहतो त्या शहराविषयी अधिक जिव्हाळा, आपुलकी निर्माण व्हावी, इथल्या चांगल्या बाबी नागरिकांसमोर याव्यात अशा उद्देशांनी या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे.

लेखक : श्रीकांत चौगुले
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ७५/-

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: Pimpri-chinchwad-gaon-te-mahanagar-by-shrikant-chougule Categories: , Tag:

Description

ऐतिहासिक संदर्भ आणि मूल्य असलेल्या व झपाट्यानं बदलू लागलेल्या गावांचा, शहरांचा, नगरांचा परिपूर्ण इतिहास हा ज्यांच्यासमोर हे बदल झाले त्या वयस्कर मंडळींना तसेच तरुण मंडळींना त्या गावाविषयी, शहराविषयी आत्मीयता वाटायला लावतात. जुन्यातलं ‘चांगलं’ कसं कालौघात नष्ट झालं याची हळहळ आणि नव्यातल्या ‘आधुनिकतेनं ‘ गावाचं सौंदर्य कसं वाढवलं याबद्दल कुतूहल अशी संमिश्र भावनाच त्या आत्मीयतेत परिवर्तित होते.

मुंबई महानगर ज्या मार्गांनी विकसित झाले, त्याच मार्गांनी पुणे शहर विकसित होत आहे. औद्योगिक पुण्याची भिस्त ही प्रामुख्यानं पिंपरी-चिंचवड या दोन जुन्या आणि धार्मिक कारणांसाठी प्रसिद्ध असलेल्या जोडगावांचं पुण्याच्या उपनगरात झालेलं रूपांतर ही पुण्याच्या औद्योगिकीकरणाची वास्तविक साक्ष. पिंपरी-चिंचवड ही ज्ञानेश्वर – तुकाराम यांच्या देहू-आळंदीच्या परिसरातील भूमी, चिंचवड हे मोरया गोसावींच्या वास्तव्यानं अधिक प्रसिद्धीस आलेलं. या जोडगावाची औद्योगिक भरभराट ज्या गतीनं झाली ती पाहता, पिंपरी चिंचवड ही देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका अशी आपली ओळख कशी पटवू लागली, हे ध्यानी येतं.

पिंपरी-चिंचवड हे झपाट्याने विकसित झालेले शहर. औद्यौगीकरणामुळे या भागातील खेड्यांचे महानगरात रूपांतर झाले. या महानगराला आध्यात्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. इथल्या मूळ गावांना इतिहास आहे, संस्कृती आहे. भोसरी गावाला इ.स. पूर्वकाळापासूनचा इतिहास आहे. चिंचवडला मोरया गोसावींच्यामुळे आध्यात्मिक, धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. दापोडीत गव्हर्नर बंगला होता. पिंपरीत जोगमहाराजांचे वास्तव्य होते. अशा इथल्या प्रत्येक गावाला त्याचा इतिहास व संस्कृती आहे. याच खेड्यांचे अवघ्या २५-३० वर्षांत समृद्ध, संपन्न महानगरात रूपांतर झाले. या शहराची जडणघडण, इथले लोकजीवन नव्याने शहरात आलेल्या लोकांना कळावे, आपण ज्या शहरात राहतो त्या शहराविषयी अधिक जिव्हाळा, आपुलकी निर्माण व्हावी, इथल्या चांगल्या बाबी नागरिकांसमोर याव्यात अशा उद्देशांनी या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे.

लेखक : श्रीकांत चौगुले
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १००/- सवलत किंमत : रु. ७५/-

Pimpri Chinchwad – Gaon te Mahanagar
Shrikant Chougule
Marathisrushti

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com