अकुतोभय
₹140.00
अकुतोभय’ म्हणजे ज्याला कुठूनही आणि कोणाकडूनही भय नाही असा. शीर्षकापासूनच वेगळेपण आणि नावीन्य जपणारा हा प्रा. नीलेश शेळके यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे; तरीही संग्रहातील कवितां मध्ये नवखेपणा फारसा नाही. ही कविता बोलते कमी पण सांगते अधिक. अनुभूतीची अस्सलता आणि रचनेतील सफाईदारपणा कवितांमध्ये दिसतो.
कवी दुष्काळी शेती कसणाऱ्या; पण माती आणि पाणी यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे कृषिसंस्कृतीशी आणि त्यातील जगण्याशी निगडित असणारे अनेक संदर्भ कवितेभर दिसतात. त्याचबरोबर आधुनिक जगण्यातील आणि तंत्रज्ञानातील अनेक प्रतिमा कवितेत अर्थवाही रूप घेऊन सगूण साकार होतात. अध्ययन अध्यापनाच्या क्षेत्रातील बेगडीपण कवीला अस्वस्थ करते आणि त्याच अस्वस्थतेतून कविता वाचकांशी संवाद साधते.
लेखक : निलेश शेळके / Nilesh Shelke
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 80
किंमत : रु. 140