अस्वस्थ क्षणांचे पाश

120.00

समाधान महाजन यांच्या कविता जशा हळुवार आहेत, तशा त्या व्यवस्थेवर डंख मारणाच्याही आहेत. उगवत्या वाटेचा त्या जसा विचार करतात, तसा उसवत्या वाटेचंही गणित मांडतात. माणसाला माणूस म्हणून मान्यता देणाऱ्या मूल्यांसाठी त्या जागल्याची भूमिकाही घेतात. त्या वेदनेशी नातं सांगतात आणि प्रतिभेचे पंख घेऊन शोधायला लागतात.

तळ भावभावनांचा… विचारविकारांचा… अंधारानं भरलेल्या वाटांना न घाबरता त्यांच्या कवितांनी हातात धरलेला आहे. आशेचा दिवा… अनेक चढण चढत, खोदकाम करत ही कविता वर्तमानाला कवटाळते.

लेखक : समाधान महाजन / Samadhan Mahajan
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 71
किंमत : रु.