गमती देशोदेशीच्या
₹100.00 ₹50.00
स्मार्ट डिजिटल पुस्तक
या पुस्तकात आपल्याला खूप वेगवेगळे अनुभव वाचता येतील. कधी नवीन माहिती कळेल तर कधी पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. काही स्थळे तर खूपच वेगळी, त्याच्यासारखे दुसरे काही न बघितल्यासारखी वाटतील.
‘जगातील सर्वात उंचावरून म्हणजे १६००० फूटांवरून धावणाऱ्या आगगाडीचा प्रवास’. तिबेट हा देश तसा भेट देण्यासाठी अवघड असल्याने खूपच वेगळे काहीतरी वाचल्याचा अनुभव येईल. नाझकाच्या अगम्य रेषा शाळेत शिकलेल्या भूगोलाची आठवण करून देतील. तर ‘इजिप्तमधले पिरॅमिडस व नाईलच प्रवास’, ‘उरोसची तरंगती बेटे’, ‘जपानचा साकुरा’, ‘स्वित्झर्लंडचे झरमॅट’, ‘दक्षिण आफ्रिकेतील ‘माबुला लॉज’ची वर्णने तिथे जाण्याची इच्छा मनात निर्माण करतील. दुबईसारख्या वाळवंटी प्रदेशातील बागा बघायला जाण्याचा नक्कीच मोह पाडतील व तिथे गेल्यावर ‘कशासाठी पोटासाठी’ मध्ये वर्णन केलेल्या कॉर्निशला भेट देण्याची आठवण नक्कीच येईल. ‘तांबोपाटा’ मधील व ‘वाईटामो केव्हज’ मधील वर्णन आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद देईल. चिनी लोकांची मुखवटा बदलण्याची कला खूपच वेगळी वाटण्याजोगी आहे. हा प्रवास कसा सुरू झाला, त्यातली ‘अडथळ्यांची शर्यत’ कशी संपली याचे वर्णन वाचून प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रवासाची आठवण आल्याखेरीज राहाणार नाही. सिंगापूरला गेल्यावर पहिले काही दिवस कसे गेले, तिथे रुळायला काय काय करावे लागले हेही ‘सिंगापूरच्या आठवणी’ वाचल्यावर काहीजणांना त्यांच्या बदल्यांमुळे आलेले अनुभव आठवायला लावतील.
या पुस्तकातील लेख हे कोणत्याही देशाच्या स्थळाच्या वा प्रवासाच्या वेळेला अनुसरून लिहिलेले नाहीत. सगळे लेख वेगवेगळे आहेत. त्यामुळे मागचा कोणताही संदर्भ मनात न धरता कधीही कोणताही लेख काढला तर तो नवीन वाटला पाहिजे. आपल्याला तसा तो वाटावा ही अपेक्षा…..
लेखक : अनामिका धनंजय बोरकर
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ५०/-
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
Description

किंमत : रु. १००/- सवलत किंमत : रु. ५०/-
Gamati Deshodeshichya
Anamica Borkar
Marathisrushti
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीचाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com