
हंडाभर चांदण्या
₹150.00
दत्ता पाटील हा लेखक आपल्या एकांकिका आणि दीर्घाकांतून सतत ग्रामीण आणि नागर जीवनातले ताण मांडत आला आहे. त्याच्या हंडाभर चांदण्याम या दीर्घाकातलं वाट पाहाणं हे वेटिंग फॉर गोदोच्या जातकुळीतलं नाही. गोदोतलं वाट पाहाणं रूपकात्मक आहे, वैराण झालेल्या जगण्याच्या विराटपणावरचं भाष्य आहे.
हंडाभर चांदण्यात जगण्याचं विराणपण रूपकातून नव्हे तर प्रत्यक्षच समोर येतं. पण या वाट पाहण्यातली तीव्रता गोदोतल्या व्लादिमिर आणि एस्ट्रॅगॉनच्या वाट पाहण्याइतकीच जीवघेणी आहे. ज्या गावात वर्षानुवर्षे दुष्काळ ठाण मांडून बसला आहे, जिथे सरकारी पाण्याचा टँकर अनेक अर्जविनंत्यांनंतरही कधीही आलेला नाही आणि हंडाभर पाण्यासाठी बायाबापड्यांना दहा दहा मैल वणवण करावी लागते, तिथे पाण्याच्या एका थेंबासाठी होणारी तगमग ही जीवनमरणाच्या सीमेवर येते. त्यामुळेच मावळवाडीच्या संभाने निर्वाणीचा उपाय म्हणून तहसिलदारबाईलाच ओलिस ठेवलं आहे.
लेखक : दत्ता पाटील, संपादन. सतीश बडवे / Datta Patil , Edit. Satish Badve
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 107
किंमत : रु. 150