जाता नाही जात

150.00

भारतीय सांस्कृतिक व्यूहात जन्मणाऱ्या प्रत्येक माणसाला लागली जाणारी अथवा लावण्यात येणारी ‘जात’ ही एक बाह्य उपाधी असली, तरीही तिने आपल्या विकासक्रमात हळूहळू वंशाची जागा घेतल्यामुळे, एकीकडे ती ‘जन्मजात’ बनलेली आढळेल, तर एकीकडे ‘पिढीजात’ बनताना आढळेल. त्यामुळे तिच्या ठायीची कृत्रिमता लोप पावून ती ह्या भारतीय पर्यावरणात ‘स्वाभाविक’ बनताना आढळते. तसंच ती एक सामाजिक संस्था बनल्यामुळे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे अनुवंशिकरित्या प्रवास करत करत ती अटळ, अढळ आणि अमर्त्य (immortal) बनलेलीही आढळते. खरे तर ‘जात’ ही फक्त भारतीय वस्तुस्थिती (phenomenon) असल्याकारणाने, ती भारतीय सामाजिक पर्यावरणात वावरणाऱ्या वा जगणाऱ्या हर एक वंशाला वारसदारीनेच आपोआप प्राप्त होत असते.

लेखक : सिद्धार्थ तांबे / Siddharth Tambe
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 84
किंमत : रु. 150